Medicine |Image Used For Representative Purpose (Photo Credits: Pixabay)

रतामध्ये कॅन्सर (Cancer) रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. असंसर्गजन्य रोगांमध्ये सर्वाधिक मृत्यू कॅन्सर मुळे होत आहेत. अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्याने आणि काहींना औषधोपचारांचा खर्च करता न आल्याने मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. पण आता सरकारने कॅन्सर सह अनेक महत्त्वाच्या औषधांच्या किंमतींमध्ये मोठी घट केली आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादी मध्ये 119 औषधांची (Medicine) कमीत कमी किंमत निश्चित करण्यात आली आहे. परिणामी कर्करोग, ताप, मधुमेह यासह अनेक आजारांचा खर्च 40 टक्क्यांनी कमी झाला आहे.

NPPA कडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या औषध किंमतींमध्ये  127 औषधांची नावं आहे. त्यापैकी  पॅरासिटामॉल, अमोक्सीसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिन सारख्या औषधांचा समावेश आहे. यापैकी अनेक औषधं बरेच रुग्ण नियमितपणे वापरतात अंगदुखी, सर्दी तापामध्ये हमखास वापरली जाणारी पॅरासिटामॉल, रक्तातील यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध, मलेरिया वरील औषध यांच्या किंमती 40% पर्यंत कमी झाल्या आहेत. montelukast आणि metformin सह काही औषधांच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. नक्की वाचा: Cancer Vanishes: कर्करोग बरा होतो, इतिहासात प्रथमच औषध चाचणीला यश? वैद्यकीय क्षेत्रात खळबळ .

इथे पहा स्वस्त झालेल्या  107 औषधांची यादी

बंगाल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (BCDA) चे सचिव सजल गांगुली यांनी TOI सोबत बोलताना, 'नवीन किंमत टॅग असलेली औषधे जानेवारी 2023च्या अखेरीस येण्यास सुरुवात होईल. नवीन किमती असलेली औषधे बाजारात येण्यासाठी साधारणपणे एक महिना लागतो. पुढील महिन्याच्या अखेरीस आम्हाला नवीन स्टॉक मिळायला हवा.' असे ते म्हणाले आहेत.