जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा अनेकदा भातावर थोड्या प्रमाणात का होईना पण पाणी तरंगते आणि आपल्यापैकी ब-याच जणांना हे भातावर आलेले पाणी फेकून देण्याची सवय असते. मात्र तुम्ही जर असे करत असाल तर हा लेख वाचल्यानंतर असे करणे तुम्ही ताबडतोब बंद कराल. खरे पाहता शिजवलेल्या भातावर आलेल्या पाण्याला आपण पेज म्हणतो. ही पेज सर्दी, खोकला यांसारख्या आजारांवर रामबाण उपाय आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यात व्हिटामिन बी, सी, ई आणि अन्य खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
त्यामुळे जर तुम्ही याआधी अशी पेज चाखून बघितली नसेल तर ते नक्की पाहा. तसेच त्याचे हे फायदे ऐकून तुम्ही भातावरचे पाणी फेकून देण्याची चूक कधीच करणार नाही. पाहा काय आहेत ह्याचे फायदे:
1. पचनक्रियेसाठी उत्तम आहार
शिजवलेल्या भाताच्या पाण्यात ब-याच प्रमाणात फायबर असतात, ज्याने तुमची पचनक्षमता (Metabolism) सुधारण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने पचनक्रियेत सुधार येतो आणि कफ च्या समस्येपासून सुद्धा आराम मिळतो.
2. शरीराला ऊर्जा मिळते
पेजेमध्ये ब-याच प्रमाणात कार्बोहायड्रेट असते, ज्याने क्षणार्धात तुमच्या शरीरातला थकवा निघून जातो. याच्या सेवनाने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.
3. वायरल इन्फेक्शनमध्ये खूपच उपयोगी
बदलणा-या मोसमानुसार, वायरल इंफेक्शन किंवा तापामध्ये पेज पिणे खूपच फायद्याचे मानले जाते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
4. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका होतो कमी
शिजवलेल्या भातावरचे पाणी प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
5. डायरिया मध्ये उपयोगी
लहान मुलं असो वा मोठे व्यक्ती. यातील कोणालाही डायरियाचा त्रास होत असले ते हे पेजेचे पाणी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.
6. डीहायड्रेशन
उन्हाळ्यात अनेकदा आपल्या शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे आपल्याला डीहायड्रेशनचा त्रास होतो. अशा वेळी पेज खाल्ल्यास डीहायड्रेशनचा त्रास होत नाही.
हेही वाचा- दही भात खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे
इतकच नाही तर या शिजवलेल्या भाताच्या पाण्याने चेह-यावरील डाग सुद्धा कमी होण्यास मदत होते. तसेच केसांची चमक वाढविण्यासाठी आपल्याला या पाण्याचा खूप फायदा होतो.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)