Health Benefits Of Banana Flowers: केळी त्या भाज्यांपैकी एक आहे जी पानांपासून मुळांपर्यंत डिशेस तसेच आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरली जाते. केळीच्या फुलांमध्ये मुबलक खनिजे असतात. ज्याचा उपयोग कच्चा किंवा शिजवून केला जाऊ शकतो. केळीच्या फूलामध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ई सारख्या घटक आढळतात. तुम्ही केळीच्या पानाचं सूप किंवा ते फ्राय करून खाऊ शकतात.
केळीच्या फुलांमध्ये अॅसिड, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात, जे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. केळ्याच्या फुलात किती गुण लपलेले आहेत ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात... (वाचा - Health Benefits Of Isabgol: वजन कमी करण्यापासून ते एसिडिटी पासून सुटका होईपर्यंत अनेक आजरांवर उपयोगी आहे 'इसबगोल' ; जाणून घ्या गुणकारी फायदे )
हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत -
स्त्रियांमध्ये अशक्तपणाची समस्या नेहमी उद्भवते. खरं तर केळीच्या फुलांमध्ये पुरेसे लोह असते. केळीच्या फुलाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते -
केळीचे फूल रक्तातील साखर नियंत्रित करते. म्हणूनच हा मधुमेहासाठी रामबाण उपाय मानला जातो.
ताण कमी करण्यास मदत -
पूर्णतः तयार केळीच्या फुलांमध्ये निराशाविरोधी घटक असतात. जे मानसिक ताण-संबंधित रोगांपासून संरक्षण करतात.
पाळीसंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत -
जर स्त्रियांना पाळीदरम्यान अधिक वेदनांसह रक्तस्त्राव होत, असेल तर केळीचे फूल दह्यामध्ये मिसळून खाल्ल्यास आराम मिळतो.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत -
केळीच्या फुलाचा लेप फेस क्रीम, मॉइश्चरायझर वापरू लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
केसांना चमक आणते -
डोक्यातील कोंडामुळे तसेच अकाली टक्कल पडल्याच्या समस्या अनेकांना जाणवतात. केळीच्या फुलांचे हेअर पॅक वापरुन ही समस्या दूर होते. याशिवाय केळीचा हेअर पॅक केसांची वाढ कायम ठेवण्यास मदत करतो.
किडनी निरोगी ठेवण्यास मदत -
केळीच्या फुलांचा उपयोग मूत्रपिंडाला निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. वास्तविक, त्यात नेफ्रोपोटेक्टिक असते. ज्यामुळे मूत्रपिंडाचे कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून संरक्षण होते.