केंद्र सरकार कडून काल 11 सप्टेंबर दिवशी सरसकट वयोवृद्धांसाठी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 70 वर्षावरील सार्यांना (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana)आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना हेल्थ इंश्युरन्सचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत वृद्ध नागरिकांना देखील आवश्यक हेल्थ कव्हरेज मिळणार आहे. मग त्यासाठीचं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य हेल्थ स्कीमचं कार्ड पहा कसं बनवाल?
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य हेल्थ स्कीम ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना मदतीचा हात म्हणून राबवण्यात येत आहे. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आता 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटी लोकांना मदत करणार आहे. यामध्ये 5 लाख रूपयां पर्यंतची मदत मिळणार आहे. कुटुंबांमध्ये ते पात्र ज्येष्ठांमध्ये विभागले जाणार आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार हा विस्तार महत्त्वपूर्ण आहे कारण अधिक वृद्धांना विभक्त कुटुंब सेटअपमध्ये आर्थिक दबावाचा सामना करावा लागतो.
Ayushman Bharat Health Insurance Card ऑनलाईन कसं काढाल?
- Ayushman Bharat च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. रजिस्ट्रेशन करा.
- Pradhan Mantri Jan Arogya Yojana kiosk वर तुमचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड व्हेरिफाय करा.
- family identification साठी आवश्यक कागदपत्र द्या.
- आता तुमचं ई कार्ड प्रिंट करून घ्या. यावर unique Ayushman Bharat ID असेल.
ऑनलाइन पात्रता तपासण्यासाठी, अधिकृत वेबसाइट वर "Am I Eligible" वर क्लिक करा. तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. आता "Generate OTP" वर क्लिक करा. ओटीपी व्हेरिफाय करा. आवश्यक माहिती देऊन "सबमिट" वर क्लिक करा.