Ayurvedic Cigarette: आयुर्वेदिक सिगारेट, पुण्यातील संशोधनास यश, पेटंटही मिळाले; तंबाखूजन्य व्यसनांपासून दूराव्यसाठी उपयुक्त असल्याचा दावा
Smoking | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

तंबाखूजन्य (Tobacco Products) पदार्थाचे सेवन वाईटच. त्यात जर त्या पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन असेल तर धोका आणखी वाढतो. त्यामुळे धुम्रपान (Smoking) करणाऱ्या व्यक्तींना व्यसन तत्काळ थांबविण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण, याउलट तुम्हाला जर कोणी धुम्रपाण आरोग्यास हितकारक असल्याचे सांगितले तर? नक्कीच भूवया उंचावतील. होय, असे घडू शकते. तेही आपल्या पुण्यात. पुण्यातील एका संशोधनास मान्यता मिळाली असून त्याबाबत संबंधितांस पेटंटही मिळाले आहे. हे पेटंट आहे आयुर्वेदिक सिगारेट (Ayurvedic Cigarette) निर्मितीबद्दल. आयुर्वेदिक सिगारेट निर्मितीस पुण्यात यश आले आहे. ही सिगारेट तंबाकुजन्य पदार्थांच्या व्यसानापासून दूर ठेवण्यास मदत करत असल्याचाही दावा केला जातो आहे.

पुणे येथील अनंतवेद आयुर्वेद ही एक संस्था पाठीमागील अेक वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने आयुर्वेदिक सिगारेट निर्मिती केली असून त्याबाबत एक पेटंटही मिळवले आहे. या संस्थेचे डॉ. राजस नित्सुरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉ. नित्सुरे सांगतात की, आयुर्वेदिक सिगारेट निर्मितीसाठी त्यांच्या तीन पिढ्या मागील 10 वर्षांपासून प्रयत्नशिल आहेत. इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांना आता कुठे यश आले आहे. (हेही वाचा, Fact Check: शाकाहार आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना COVID-19 चा धोका कमी? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याला असलेला धोका विचारात घेऊन तो कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यासाठी आम्हाला धुम्रपानास उपलब्ध करायचा होता. त्यामुळे आम्ही या सिगारटेची निर्मिती केल्याचे डॉ. नित्सुरे सांगतात. या सिगारेटमुळे धुम्रपानास पर्याय निर्माण होऊ शकतो. शिवाय त्याचा आपण कधीही वापर करु शकतो. व्यसनाधनितेकडून आरोग्य संपन्नतेकडे जाण्यासाठी हे आयुर्वेदिक सिगारेट फायदेशीर ठरेल, असा दावाही डॉ. राजस नित्सुरे करतात.

डॉ. राजस नित्सुरे पुढे दावा करतात की, आम्ही केलेल्या संशोधनानुसार सुमारे तीन महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन जर व्यसन करायचे असेल तर, त्यासाठी हर्बल सिगारेट हा पर्याय चांगला ठरु शकतो, असेही डॉ. नित्सुरे सांगतात.