कोरोनावर मात केल्यानंतर चव आणि वास पुन्हा येण्यास लागू शकतो वर्षाचा कालावधी- स्टडी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर वास घेणे किंवा चव परत आली नसल्यासारखे वाटते? या दोन्ही गोष्टी परत येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लाग असल्याचे एका नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. वर्ष 2020 च्या सुरुवातीला परसलेल्या कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर लोकांच्या तोंडाची चव जाणे किंवा एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची समस्या उद्भवू लागली होती. याचा लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला.(COVID-19 Vaccine Update: सीरम इंस्टीट्यूट उत्पादीत Covovax लसीच्या लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स जुलैपासून सुरु)

जामा नेटवर्क ओपनमध्ये गुरुवारी प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, फ्रांसमध्ये स्ट्रासबर्ग युनिव्हर्सिटी हॉस्टिपटलच्या शोधकर्त्यांनी कोरोनाची लागण झालेल्या 29 रुग्णांवर अभ्यास केला. त्यांची पूर्ण वर्षभर तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता नाहीशी झाली होती. चार महिन्यात यांच्यावर एक सर्वेक्षण करण्यात आले. 97 पैकी 51 रुग्णांना गांभीर्याने काळजी घेण्यास सांगण्यात आले. कारण जशी वास घेण्याची किंवा चव परत आल्यास त्याबद्दल संशोधकांना कळवावे असे त्यांना सांगितले गेले. आठव्या महिन्यात 51 मधील 49 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले. त्यांच्यामध्ये वास घेण्यासह चव सुद्धा परत आली.(WHO कडून अलर्ट! लस घेतलेल्यांना सुद्धा Delta Plus वेरियंचा धोका, जाणून घ्या लक्षणे)

उर्वरित दोन रुग्णांपैकी एक पूर्णपणे बरा झालेला नाही. तो वास घेण्यास सक्षम होता पण योग्य पद्धतीने नाही. दुसऱ्या रुग्णाला वास घेण्यास सक्षम नव्हता. अन्य 49 कोविड रुग्णांना ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंगला सामोरे जावे लागले. त्यांनी पूर्ण एक वर्षानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली.