Happy Teacher's Day 2021 Images: शिक्षक दिनानिमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन गुरुंना करा वंदन!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त (Sarvepalli Radhakrishnan Birth Anniversary) शिक्षकांचा आदर व्यक्त करण्यासाठी 5 सप्टेंबर (Happy Teachers Day 2021) रोजी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. देशात प्राचीन काळापासून गुरू, शिक्षकांची परंपरा चालत आली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई- वडिलांनंतर शिक्षकाचे योगदान मोलाचे ठरते. कारण, एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन, त्यांची काळजी घेऊन आणि त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो. शिक्षक भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व योग्य मार्गावर चालण्यासाठी सकारात्मक दृष्टी मिळते.

गुरु-शिष्य परंपरा हा भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याची अनेक सुवर्ण उदाहरणे इतिहासात नोंदलेली आहेत. शिक्षक हा माळीसारखा असतो, जो विद्यार्थ्यांच्या रुपात एक यशस्वी, सुंदर बाग फुलवतो. यामुळे शिक्षकप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हे देखील वाचा- Teachers’ Day 2021 Quotes: शिक्षक दिन निमित्त शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारे सकारात्मक विचार WhatsApp Status, Facebook Messages द्वारा करा शेअर

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

प्रत्येकाच्या जीवनात 'गुरु'ला खूप महत्त्व आहे. त्यांना समाजातही विशेष स्थान आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणावर खूप विश्वास होता. ते एक महान तत्त्वज्ञ आणि शिक्षक होते. अध्यापनावर त्यांचे मनापासून प्रेम होते. एक आदर्श शिक्षकाचे सर्व गुण त्याच्यामध्ये होते. या दिवशी भारत सरकारकडून देशभरातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कारही दिले जातात.