
Happy Rainy Day: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता मुंबई शहर, उपनगर, ठाणेमध्येही पावसाचा जोर वाढायला लागला आहे. 1 जूनला केरळात (Kerala) आणि 11 जूनला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon Season) यंदा प्रवेश केला आहे. . काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आदळलं आहे. त्यामुळे निसर्गाचा रूद्रावतार पाहिल्यानंतर वातावरणात मान्सूनमुळे येणारी हिरवळ पाहण्यास अनेक जण उत्सुक आहेत. शेतकर्यांसोबतच जनसामान्यांनाही पहिल्या पावसाची उत्सुकता आहे. मग या मान्सून सीझनचा, या नव्या ऋतूचा आनंद आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) च्या माध्यमातून मराठामोळी ग्रिटिंग्स, विशेस, मेसेजेस, इमेजेस,वॉलपेपर नक्की शेअर करून मान्सून आणि पावसाळी ऋतूचं स्वागत करा.
आज मुंबई सह आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसांची बरसात सुरू झाली आहे. पाऊस म्हटला की काहींसाठी चिखल, ट्राफिक जॅम अशा गोष्टी असतात तर काही जण पहिल्या पावसात भिजण्यासाठी, भुट्टा खाण्यासाठी बाहेर पडतात, पण यंदा मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असल्याने अनावश्यक गर्दी, विनाकारण पावसात भिजणं टाळा असंं आवाहन करण्यात आलं आहे. पण खिडकीत उभं राहून तुम्ही यंंदाच्या पहिल्या पावसाचा नक्कीच आनंद लुटू शकता.




यंदा जगभर कोरोनाची संकटाची दहशत असल्याने पावसाळा ऋतू वेगळा असेल. एरवी सारखी पहिल्या पावसात भिजण्याची, चिखलात फूटबॉल खेळण्याची धम्माल मस्ती करण्यावर बंधनं आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही तुम्ही यंदा काही वेगवेगळ्या अंदाजात राज्यात पावसाचं स्वागत करू शकतात. पर्यावरणातील या सुंदर बदलाचे साक्षीदार होऊ शकता. हा नवा ऋतू तुमच्या आयुष्यातही नवचैतन्याची पालवी घेऊन येवो हीच सदिच्छा ! हॅप्पी मान्सून सिझन.