अंबानी कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आकाश-श्लोकाच्या लग्नाचा जल्लोष सुरु आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश याचा विवाह 9 मार्चला संपन्न होणार आहे. त्यापूर्वी काही दिवस आकाश-श्लोकाचे प्री वेडिंग सेलिब्रेशन स्विर्झरलँड येथे रंगले. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. आकाश-श्लोकाच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये मुकेश-नीता अंबानी यांचा 'ऐ मेरी जोहराजबी' गाण्यावर डान्स (Video)
त्यानंतर आता अंबानी यांचे मुंबईतील ऍन्टिलिया (Antilia) हाऊसमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अंबानी हाऊसचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आकाश-श्लोकाच्या विवाहनिमित्त घर राधा-कृष्ण थीमवर सजवले जात आहे. आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या शाही लग्नपत्रिकेचा थाट सोशल मीडियावर व्हायरल (Video)
फुले, लाईट्स यांनी सजवलेले घर तुम्ही व्हिडिओत पाहु शकता...
7 मार्चला मेंहदी सोहळा होईल तर 9 मार्चला आकाश-श्लोकाचा शाही विवाहसोहळा पार पडेल. विवाहसोहळ्यात बॉलिवूड स्टार्स सह अनेक दिग्गज उपस्थित राहतील.
प्री वेडिंग सेलिब्रेशनला अर्जुन कपूर, मलायका अरोरा, रणबीर कपूर, आमिर खान, शाहरुख खान, आलिया भट्ट आणि करण जोहर यांसारखे बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. स्विर्झरलँडला प्री वेडिंग सेलिब्रेशनपूर्वी मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये गरबा नाईट रंगली होती. त्यात फाल्गुनी पाठक यांचा बहारदार परफॉर्मन्स पाहयला मिळाला.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा शाही विवाहसोहळ्याला 9 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल. तर 11 मार्चला ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.