Rishi Panchami Special: ऋषि पंचमी पंचमी निमित्त कशी बनवाल 'ऋषीची भाजी', पहा रेसिपी Video
ऋषीची भाजी (Photo Credits-Facebook)

देशभरासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होताना दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती असली तरीही गणेशोत्सवाचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही. तर गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमी (Rishi Panchami) साजरी करण्यात येते. तर भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषि पंचमी असे सुद्धा म्हटले जाते.(Rishi Panchami 2020 Vrat Puja Vidhi and Muhurt: ऋषि पंचमी चे व्रत कसे कराल? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त)

तर नकळत झालेल्या पापांमधून मुक्तता मिळावी आणि हिंदू पुराणानुसार, सातही ऋषींच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रती असणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. या व्रता दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी खासकरुन ऋषीची भाजी सुद्धा बनवली जाते. तर यंदाच्या ऋषी पंचमी निमित्त ही स्पेशल भाजी बनवण्याची रेसिपी येथे पहा: (Atharvashirsha & Ganpati Stotram: गणेश चतुर्थी निमित्त श्री गणपती अथर्वशीर्ष, स्तोत्र, गायत्री मंंत्राने करा दिवसाची मंंगलमय सुरुवात (Watch Video)

दरम्यान, ऋषी पंचमी हा गणेश चतुर्थीनंतर येणारा दुसरा दिवस असतो. या दिवशी अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक तलावं, पाणवठे, नदी किंवा आता कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते.