Republic Day 2019 Special Recipes: सध्या देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी परेड, चित्ररथ, विविध कार्यक्रम यांची रेलचेल असेलच. पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी, शाळांमध्ये, सोसायट्यांमध्ये झेंडावंदन आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पण कोणताही कार्यक्रम खाद्यपदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुम्ही या तिरंगी रेसिपीज बनवून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवू शकता.
तिरंगी वेलकम ड्रिंक
प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये तिरंगी वेलकम ड्रिंक देऊन पाहुण्यांचे स्वागत करु शकता. तिरंगी वेलकम ड्रिंक लाईम ज्युस, कोल्ड ड्रिंक आणि हिरव्या रंगाच्या सिरपने बनवू शकता. हे ड्रिंक झटपट बनेल आणि रिफ्रेशिंग ठरेल.
तिरंगा सँडविच
हा पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा असून स्नॅकचा उत्तम पर्याय ठरेल. तिरंगा सँडविचसाठी तुम्हाला दोन रंगाच्या चटण्या बनवाव्या लागतील. नारंगी रंगाची चटणी आणि हिरव्या रंगाची चटणी. सफेद रंगाच्या ब्रेडमध्ये या दोन रंगी चटण्या घालून त्यावर चीज किंवा मॅयोनिज घाला. मस्त तिरंगा सँडविच तयार.
तिरंगी ढोकळा
आजकाल तिरंगा ढोकळा लोकप्रिय होऊ लागला आहे. मिठाई आणि स्नॅकच्या अनेक दुकानांमध्ये हा तिरंगी ढोकळा विक्रीसाठी उपलब्ध असतो. मात्र तुम्ही हा ढोकळा घरीही बनवू शकता.
तिरंगी सलाड
तिरंगी रेसिपीज मधील सर्वात हेल्दी पदार्थ आहे तिरंगी सलाड. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या लागतील. त्यावर सॉसेस घालून तुमचे तिरंगी सलाड तयार होईल. हेल्दी टेस्टी असे हे सलाड अगदी झटपट तयार होईल.
तिरंगी कुल्फी
जेवणाचा शेवट आपण साधारणपणे गोड खावून करण्याची पद्धत आहे. त्यासाठी ही तिरंगी कुल्फी.
या तिरंगी रेसिपीज तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा. वर्षातून फक्त दोनच दिवशी या रेसिपीज साधारणपणे केल्या जातात. त्यामुळे या रेसिपीजने यंदाचा प्रजासत्ताक दिन खास करा. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!