National Pizza Day: पिझ्झा हा इटली या देशाचा खाद्य पदार्थ आहे. हा पदार्थ प्राचीन काळापासून खाल्ला जात आहे असं सांगितलं जात आहे. दरवर्षी 9 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय पिझ्झा दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वात ड्रेंड मध्ये खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा. जगात पिझ्झा न खाणारे लोक क्वचित सापडतील. भारतात 70 च्या दशहकात पिझ्झा खाणारे लोक हे श्रींमत वर्गातले मानले जायचे. सर्वात लोक प्रिय पदार्थांपैकी म्हणून पिझ्झाला ओळखले जात आहे. पिझ्झा चीज आणि पावमुळे हा अनहेल्दी पदार्थांपैकी एक होता. पण कालांतराने पिझ्झा बनवण्याची पध्दत बदलली. त्यामुळे आता घरच्या घरी देखील हेल्दी पिझ्झा बनवून शकता. त्यासाठी आम्ही एक हेल्दी पिझ्झा घरच्या घरी कसा बनवू शकते त्याकरीता एक रेसिपी आणली आहे. जाणून घ्या रेसिपी
रव्यापासून पिझ्झा तयार करण्यासाठी, एका मोठा मिक्सिंग बाऊल मध्ये रवा आणि मीठ घालून मिक्स करा.त्यात एक कप ताक किंवा दही मिक्स करा. आता अर्ध कप पाणी घालून मिश्रण तयार करा. आता हे बॅटर १५ ते २० मिनिंटासाठी बाजूला ठेवा. पिझ्झा सॉस तयार करण्यासाठी टोमॅटो सॉस, मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकून मिसळा, त्यानंतर रवाचे बनलेलं पिठ घ्या त्याला चमच्याने पुन्हा मिसळा आणि एक कप पाणी घालून बॅटरची जाडी कमी करा. (हेही वाचा- मेन्यू कार्डमध्ये आला मसाला डोसा बर्गर; नेटक-यांनी ट्विटरवर दिल्या संमिश्र प्रतिक्रिया)
गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवा आणि मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यानंतर थोडे तेल पसरला. एका भाड्यांत रवा बॅटर घेऊन तब्यावर ओता आणि गोल पिझ्झा बेस तयार करा. बेस जाडसर असणे आवश्य आहे. आत काटेरी चमचेने काही होल पाडा. पिझ्झा बेस शिजल्यानंतर एक चमच तेल घालून पलटून घ्या. त्यानंतर पिझ्झा सॉस आणि चीज टाका. आवडीनुसार (सोयाबीन, चिकन, पनीर) कच्चा भाज्या टाका,टॉमेटा कांदा, सिमला मिरची, कॉर्न घाला.त्यावर पुन्हा चीज आणि चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स घाला. चीज वितळल्यावर गॅस बंद करा आणि प्लेटमद्ये सर्व्ह करा.त्याचे तुकडे करा आणि गरमागरम सॉस सोबत त्याचा आनंद घ्या.