Gulab jam And dosa PC INSTA

 Gulabjam Dosa Video: बाजारात नेहमीच नवनवीत फुड कॉम्बिनेशन येत असतात. हे फुड कॉम्बिनेशन काही वेळास नेटकऱ्यांना आवडतात.त्यात आता बाजारात नवीन फुड कॉम्बिनेशन  (Food Combination) आला आहे. डोसा आणि गुलाबजामूनची डिश पाहून नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. प्रसिध्द होण्यासाठी आणि नवनवीत व्हिडिओ (Video) बनवण्यासाठी लोक कोणताही विचित्र पदार्ख मिक्स करून व्हिडिओ पोस्ट करतात. त्यात चॉकलेट ऑमलेट, ओरियो पकोडे असं अनेक खाद्य पदार्थांचा मिश्रण करून तयार करतात. (हेही वाचा- कांदा भजी ऐकली होती! पण, कांद्याचा चहा? घसा खवखवणे, दुखणे यावर प्रभावी आहे म्हणे)

इंस्टाग्रामवर Foodpandits या अंकाऊटवरून एका फूड व्लॉगरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुकानदार डोसा तयार करण्यासाठी पिठ तव्यावर टाकतो त्यानंतर गुलाब जामुनचे तीन तुकडे टाकतो. त्यानंतर आणखी काही गुलाब जामुन फोडतो. पुढे, त्याने काही नारळाचे तुकडे, मलई आणि साखरेचा पाक टाकला. त्रिकोणी डोसा बनवून त्यानंतर तो प्लेटमध्ये सर्व्ह केला. दोघांन्ही मिळून हा पदार्थ खाल्ला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Foodpandits! (@foodpandits)

या व्हिडिओ पोस्टवर त्यांने अतरंगी गुलाब जामुन डोसा,” असा कॅप्शन लिहिले आहे. आता पर्यंत लाखोंनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे.  चंदीगडच्या सेक्टर १५ येथे हा गुलाबजाम डोसा विकला जातो.