Easy Papad Recipes: न लाटता झटपट बनवता येणा-या पळी पापडाच्या रेसिपीज
Papad (Photo Credits: YouTube)

उन्हााळा सुरु झाला की महिलांचे पापड, फेण्या, कुरडई, लोणचं, मसाले बनविण्याचे प्रकार सुरु होतात. यासाठी त्यांच्यामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे मसाले बनविण्यावर थोडी बंधने आली आहेत, मात्र लॉकडाऊन कामावर जाणा-या महिला देखील घरात असल्यामुळे अनेकांच्या घरातून पापड (Papad) बनविण्याचे काम सुरु झाले आहे. पापड म्हटले की लाटण्याचे मोठे काम असते. अशा वेळी शेजा-या-पाजा-यांना बोलवून घरात पापड लाटण्याचे बेत रंगतात. मात्र यंदा सोशल डिस्टंसिंग नियम पाळावयाचा असल्यामुळे अनेकांना तसे करता येणार नाही.

अशा वेळी हे पापड बनवायचे कसे असा मोठा प्रश्न अनेक महिलांना पडला असेल. म्हणून आज आम्ही तुम्हाला आज न लाटता झटपट बनवता येणा-या पळी पापडाचे काही प्रकार सांगणार आहोत. जे तुम्ही घरच्या घरी एकटे सुद्धा हे पापड बनवू शकता.

पाहा पळी पापडाच्या काही हटके रेसिपीज:

साबुदाणा-बटाटा पापड

हेदेखील वाचा- Summer Tips: उन्हाळा आणि लॉकडाऊन चा योगायोग साधून घरी बनवा साबुदाणा-बटाटा सांडगे ते कुरडई सारखे कुरकुरीत आणि खमंगदार पदार्थ, पाहा हटके रेसिपीज

तांदळाचे पापड

पोह्याचे पापड

हेदेखील वाचा- Mango Recipes: घरच्या घरी तयार करा आंब्यापासून बनवलेल्या 'या' हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज

नाचणीचे पापड

रव्याचे पापड

पापड हा लहानग्यांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदा लॉकडाऊन घराबाहेर पडता येत नाही आहे. तसेच अनेक ठिकाणी पापड मिळणे देखील मुश्किल झाले आहे. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट हे पळी पापड बनवून घरच्यांना खूश करु शकता.