प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दिवाळीच्या सणामधील आज धनोत्रयोदशीचा (Dhanatrayodashi) दिवस. अश्विन शुक्ल त्रयोदशी दिवशी धन धान्य आणि आर्थिक संपन्नतेसाठी धनाची देवता कुबेराची प्रार्थना केली जाते. निरोगी आणि निरामय आरोग्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते तशीच या दिवशी यमदीप दान (Yam Deep Daan) करण्याची प्रथा आहे. पुढील वर्षभरात कुटुंबामध्ये अपमृत्यूचं संकट येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमदेवतेसाठी एक दिवा दान करण्याची पद्धत आहे. Happy Dhanteras 2020 Images: धनत्रयोदशी निमित्त HD Photos, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!

आज (13 नोव्हेंबर) दिवशी देशभरात धनोत्रयोदशीची धूम आहे. अनेकजण या दिवशी सोनं खरेदी करतात. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करून या सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. दरम्यान या आनंदाच्या, उत्साहाच्या काळातही आरोग्य संकट दूर ठेवण्यासाठी दीपदान केले जाते. हा दिवा कणकेचा करून ठेवला जातो.

धनत्रयोदशी 2020 चा मुहूर्त

धनत्रयोदशी सुरू कधी - 12 नोव्हेंबर 9.30 वाजता रात्री

धनत्रयोदशी संपणार कधी - 13 नोव्हेंबर 5.59 संध्याकाळ

धनत्रयोदशी सायं संध्या - 13 नोव्हेंबर 6. 6.01 ते 07. 17 PM

यमराजाने यमदूतांना एकदा प्रश्न केला होता तुम्हांला कधी प्राणीजीवांचे जीव हरण करताना दया येत नाही का? त्यावेळेस यमदूत म्हणाले, 'एखाद्या कमी वयाच्या मनुष्यजीवाचा प्राण हरण करताना त्रास होतो, त्यावेळचा आकांत हृद्यद्रावक असतो. तुम्हीच अपमृत्यू टाळण्यासाठी उपाय सांगा. यावर यमराजांनी सांगितलेल्या उपायानुसार धनत्रयोदशी दिवशी जो दीपदान, व्रत करेल त्याला अपमृत्यू येणार नाही.