
आपल्याला माणूस म्हणून घडवायला आई, वडीलांनंतर शिक्षक हे मह्त्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे गुरू पौर्णिमा तसेच 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 ऑक्टोबर दिवशी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. 1994 पासून हा जागतिक शिक्षक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. या दिवसाचं औचित्य साधून विद्यार्थी शिक्षकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. मग तुमच्या देखील शिक्षकांना आजच्या या जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स, Wishes, Messages देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
शिक्षक हा समाज घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावत असतो. या निमित्ताने त्यांच्यकडून तुमच्यावर संस्कारामुळे तुम्हांला एक दिशा मिळाली आहे त्यामुळे त्यासाठी देखील त्यांना आज नक्की एकदा धन्यवाद म्हणायला विसरू नका.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा





The Transformation of Education Begins With Teachers या थीम वर यंदा शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे. युनेस्को कडून 1994 साली जागतिक स्तरावर शिक्षक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.