World Surya Namaskar Day 2025 HD Images

World Surya Namaskar Day 2025 HD Images in Marathi: हिंदू धर्मात सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी माघ मासातील शुक्ल सप्तमीला  रथसप्‍तमी (Ratha Saptami) हा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमीला महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, असेही मानले जाते. भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच रथसप्‍तमीदिवशी सूर्यनमस्कार (Surya Namaskar) घालून सूर्यदेवेतेची आराधना केली जाते. याच दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिनही (World Surya Namaskar Day 2025) साजरा केला जातो. उगवत्या व मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. रथसप्तमी हा दिवस सूर्यनमस्काराची महत्वाकांक्षी साधना आणि सूर्य देवतेच्या कृपेसाठी एक उत्तम दिवस आहे. या दिवशी सूर्यनमस्काराचा सराव व्यक्तीच्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन आणू शकतो. सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे.

अशाप्रकारे सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने, योगा प्रेमी, स्वस्थ जीवनशैलीचा पाठिंबा देणारे लोक, आणि योग शिक्षक या दिवशी सूर्यनमस्कार करतात. अनेक ठिकाणी एकत्र येऊन, मोठ्या संख्येने 12 आसनांची सिरीज केली जाते. (हेही वाचा: Surya Namaskar Day 2025 Wishes: रथसप्तमीदिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त खास WhatsApp Status, Quotes, Messages द्वारे शुभेच्छा देत करा सूर्यदेवतेची आराधना)

तर या दिवसानिमित्त काही Messages, Whatsapp Status, Images, Wishes द्वारे द्या सूर्यनमस्कार दिनाच्या शुभेच्छा

World Surya Namaskar Day 2025 HD Images
World Surya Namaskar Day 2025 HD Images
World Surya Namaskar Day 2025 HD Images
World Surya Namaskar Day 2025 HD Images
World Surya Namaskar Day 2025 HD Images

दरम्यान, सूर्यनमस्कार हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. सूर्यनमस्काराचे नियमित सराव केल्याने शरीराची लवचिकता वाढते. सूर्यनमस्कारामुळे पचनशक्ती वाढते. पोटाशी संबंधित समस्यांसाठी (जसे की बद्धकोष्ठता) हे फायदेशीर ठरते. सूर्यनमस्कारामुळे ताण आणि मानसिक दबाव कमी होतो. हे ध्यानाच्या प्रक्रियेसारखे कार्य करते. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील ऊर्जा आणि ताजेपण वाढते. सूर्यनमस्कारामुळे रक्तप्रवाह सुधारतो, जो त्वचेची चमक आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतो.