Surya Namaskar Day 2025 Wishes in Marathi: माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तम साजरी केली जाते व याच दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन (Global Surya Namaskar Day) असतो. यंदा 4 फेब्रुवारीला ही दोन्ही दिवस साजरे होणार आहेत. रथसप्तमी हा एक हिंदू धार्मिक सण असून तो विशेषतः सूर्य देवतेला समर्पित आहे. या दिवशी सूर्य देवतेची पूजा केली जाते आणि त्यासाठी विशेष सूर्यनमस्कार करण्याची परंपरा आहे. रथसप्तमीला सूर्याची आराधना आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सूर्यनमस्कार केला जातो. सूर्यनमस्कार हा एक प्राचीन योगासन आहे, ज्याचे अनेक शारीरिक, मानसिक, आणि आध्यात्मिक फायदे आहेत. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या दिवशी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शरीर आणि मनाची शुद्धता साधण्याचा आणि सूर्य देवतेच्या आशीर्वादाची मागणी करण्याचा हेतू असतो.
या दिवसाचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध संस्थांद्वारे सूर्यनमस्काराचे आयोजन केले जाते आणि अनेक लोक यात सहभागी होतात. संपूर्ण भारतात आणि विविध देशांमध्ये हा दिवस साजरा होत आहे. या दिवशी लोक आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सूर्यनमस्काराच्या आसनांचा अभ्यास करतात.
तर या दिवसाचे औचित्य साधत तुम्ही, WhatsApp Status, Quotes, Messages, Wishes द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: Next Kumbh Mela: वर्षे 2025 नंतरचा पुढील कुंभमेळा कधी व कुठे होणार? जाणून घ्या या धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सवाच्या आगामी तारखा व महत्व)
दरम्यान, सूर्यनमस्कार या योगासनात 12 पदांचा समावेश असतो, ज्यात शरीराच्या विविध भागांचा व्यायाम होतो. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, पचनशक्ती मजबूत होते, मांसपेशी लवचिक होतात, ताकद वाढते, हाडांची मजबूती वाढते आणि मानसिक शांती मिळते. त्यात विविध आसनांचा समावेश केल्यामुळे संपूर्ण शरीराचा ताण निघून जातो. सूर्यनमस्कार ध्यान केंद्रित करण्यास मदत करते. यासह सूर्यनमस्कार एक प्रकारे सूर्य देवतेला अर्पण केलेली प्रार्थना आहे. यामुळे आध्यात्मिक उन्नती साधता येते आणि जीवनातील सकारात्मकता वाढवता येऊ शकते.