
World Music Day 2021 Quotes With HD Images: कोरोना संकट काळात 21 जून हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण या दिवशी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. तर दुसऱ्य बाजूला जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जाणार आहे. म्युझिक म्हणजेच संगीत अशी एक गोष्ट आहे जी सुखात किंवा दु:खात व्यक्तीच्या नेहमीच सोबत असते. ऐवढेच नव्हे तर एखादे संगीत ऐकल्यानंतर आपले मन शांत होण्यास सुद्धा मदत होते. कधी तुम्ही विचार केला आहे का, जर संगीत आपल्या आयुष्यातील एक भाग नसता तर काय झाले असते? असे असते तर आपले आयुष्य निराशा आणि कुठेतरी रंगहिन झाले असते. पण संगीताची आयुष्यात जोड असेल तर कोणताही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत याचा आधार घेऊ शकतो. याच कारणास्तव संगीताचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन सुद्धा साजरा केला जातो.
संगीत असा एक आधार आहे जो आपल्या आयुष्यातील कोणत्याही वळणावर आपली साथ नेहमी देतो. मधुर गाणे आपले मन शांत करण्यास आपल्याला असलेल्या काही आजारांपासून सुद्धा बरे करते. याच खास दिवसानिमित्त आपल्या मित्र-परिवारांसह नातेवाईकांना इंस्टाग्रामवरील 'हे' विचार तुम्ही पाठवून त्यांना आजचा दिवस साजरा करण्यास नक्कीच प्रेरित कराल.(International Yoga Day 2021 Quotes: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images, Wishes, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)








