21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा केला जातो. आधुनिक काळात योगास विशेष महत्त्व आहे. योग आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. योगाचे जनक महर्षि पतंजली असून योगाला फार मोठा इतिहास आहे. सध्याच्या काळातही जगातील अनेक देशांमध्ये योगाचा अभ्यास केला जातो. भारतात योगाभ्यास करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता. लोकांना योगाबद्दल जागरूक करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता, कारण योग केल्याने एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकते. सध्याच्या कोरोना काळात तर योगाचे महत्त्व आणखीन वाढले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात केले. संयुक्त राष्ट्र महासभेने हा ठराव स्वीकारल्याच्या 3 महिन्यांच्या आत 11 डिसेंबर 2014 रोजी जगभरात योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. यानंतर, आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जात आहे. तर जागतिक योग दिनानिमित्त खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images, Quotes पाठवून द्या शुभेच्छा.
योग माणसाची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवते
जागतिक योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
जे केवळ योगामुळेच मिळते.
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
योग मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांना
ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करतो
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
योग म्हणजेच संतुलित मन, सुखी , निरोगी आणि समृध्द जिवनाचा राजमार्ग
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!
योग माणसाची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवते
जागतिक योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
योग अशा गोष्टी ठीक करतो ज्या आपण सहन करू शकत नाही,
आणि अशा गोष्टींना सहन करण्याची ताकद देतो ज्या कधी ठीक होऊ शकत नाहीत
जागतिक योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
दरवर्षी योग दिनाची वेगवेगळी थीम असते. यावर्षी म्हणजे 21 जून 2021 रोजी योग दिनाचा विषय असणार आहे, 'योग फॉर वेलबिइंग’ अर्थात 'आरोग्यासाठी योग'. दरम्यान, योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय.
योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित नाही. शारीरिक स्तरावरील त्याचे फायदे दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो.