World Emoji Day 2020 निमित्त जाणून घेऊया '7' गोंधळात टाकणाऱ्या इमोजी!
Emojis (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्याचं युग हे डिजिटल आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्यक्त होताना इमोजीचा वापर अगदी सर्रास केला जातो. अगदी थोडक्यात भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा पर्याय सर्वांनाच जवळचा वाटतो. फार न बोलता इमोजीच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे सोपे होते आणि समोरच्यालाही ते अगदी सहज कळते. आपल्या जीवनाच्या अभिवाज्य भाग बनलेल्या इमोजींच्या सेलिब्रेशनचा आजचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना Happy World Emoji Day 2020! सध्याच्या कोविड-19 च्या काळात तर सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे साहजिकच आपले कोणतेच संभाषण या इमोजींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण अनेकदा काही इमोजी गोंधळात टाकणारे असतात. तर काही इमोजींचा अर्थच आपल्याला उलघडत नाही. त्यामुळे अनेकदा ते चुकीच्या वेळेस वापरले जातात. तर वर्ल्ड इमोजी डे निमित्त जाणून घेऊया काही Confusing Emojis बद्दल...

Grimacing Face Emoji 😬

दात दाखवून हसणारा हा इमोजी आपण अनेकदा मनसोक्त हास्य दाखवण्यासाठी वापरतो. पण हा इमोजी उदास चेहरा दर्शवतो.

Prayer Emoji 🙏

हात जोडलेले हे हात प्रार्थना किंवा रामराम, नमस्कार करण्यासाठी केला जातो. पण Emojipedia नुसार, आभार मानण्यासाठी हे हात जोडलेले आहेत.

Person Tipping Hand 💁

हे इमोजी अनेकदा अॅटीट्युड दाखवण्यासाठी वापरण्यात येते. पण रिसेप्शन डेस्क वरील व्यक्ती दाखवण्यासाठी हे इमोजी तयार करण्यात आले आहे. काहीजण एखादी मुलगी केस बाजूला करत आहे, या आशयाने देखील हे इमोजी वापरतात.

Person Pouting 🙎

हा एक खूप गोंधळात टाकणारा इमोजी आहे. कारण यात ती मुलगी पाऊट करते हे मुळात कळतं नाही. काहीसा गंभीर चेहरा दाखवण्यासाठी हा इमोजी साधारणपणे वापरला जातो.

Pinching Hand 🤏

हा गेल्या वर्षीच लॉन्च झालेला नवा इमोजी आहे. हा इमोजी लॉन्च झाल्यावर Small Penis दाखवण्यासाठी नेटकऱ्यांनी याचा वापर केला. पण emojipedia नुसार हा इमोजी चिमटा काढण्यासाठी आहे.

Call Me 🤙🏻

यो साठी तरुणाई हा इमोजी वापरते. पण खरंतर कॉल मी हे दर्शवण्यासाठी हा इमोजी तयार करण्यात आला आहे.

Waving Hand 👋

तुम्ही हा वेव्हिंग हँड कानशिलात लगावण्यासाठी किंवा हाय/गुडबाय बोलण्यासाठी वापरला आहे? येस. हा इमोजी हाय/गुडबाय करण्यासाठी आहे. मारण्यासाठी नाही.

अशा विविध आणि नवनव्या स्माईलजी, इमोजीज, इमोटीकॉन्सने सोशल मीडिया समृद्ध होत आहे. पण त्याचा योग्य अर्थ समजून घेणे देखील गरजेचे आहे. तरी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इजोजींचा वापर करु शकता. पण तुम्ही ज्या व्यक्तीशी संवाद करत आहात त्याला देखील त्याचा तोच अर्थ माहित असणे अपेक्षित आहे. अन्यथा गोंधळ होऊ शकतो. असो. तुम्ही इमोजीचा मनसोक्त वापर करा आणि शब्दांशिवाय बोलण्यातील आनंद घ्या.