Datta Jayanti 2024 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

Datta Jayanti 2024 HD Images: दत्तात्रेय जयंती (Dattatreya Jayanti 2024) ही दत्त जयंती (Datta Jayanti 2024) म्हणूनही ओळखले जाते. हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या एकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान दत्तात्रेय यांचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा शुभ दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो. संपूर्ण भारत आणि जगभरातील भक्त हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळला जातो. यंदा 14 डिसेंबर रोजी म्हणजेचं आज सर्वत्र दत्तात्रेय जयंती साजरी करण्यात येत आहे.

भगवान दत्तात्रेय हे दैवी त्रिमूर्तीचे मूर्तिमंत रूप मानले जातात, ते निर्माता ब्रह्मा, रक्षक विष्णू आणि संहारक शिव यांचे प्रतीक आहेत. भगवान दत्तांना सर्व गुरूंचा स्वामी असल्याचे म्हटले जाते. त्यांची जीवनकथा आणि शिकवण आध्यात्मिक साधकांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे. दत्त जयंती निमित्त तुम्ही खालील Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता.

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक

आणि मंगलमय शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास आणि आपल्या

परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी भक्त लवकर उठतात आणि शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणाचे प्रतीक असलेले धार्मिक स्नान करतात. त्यानंतर दत्ताच्या मंदिरांना भेट देतात आणि भगवान दत्तात्रेयांचे आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजा करतात. या दिवशी भगवान दत्ताला फुले, धूप, दिवे आणि नैवैद्य अर्पण केला जाता. काही लोक या दिवशी उपवास करतात.