Happy New Year 2025 Quotes: 2024 हे वर्ष संपण्यासाठी काही तासांचा कालावधी बाकी आहे. हे वर्ष आपल्या आनंद, आव्हाने आणि अनुभवांसह आपला निरोप घेत आहे. 31 डिसेंबर रोजी संपूर्ण जग नवीन उत्साह आणि उर्जेने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रत्येक वर्षाचा पहिला दिवस हा एक दिवस असतो, जेव्हा जवळजवळ संपूर्ण जग या दिवशी आनंद साजरा करते. ही केवळ एक तारीख नाही तर नवीन अध्याय, नवीन सुरुवात आणि नवीन आशांचे प्रतीक आहे.
नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रांना नववर्शाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास नवीन वर्षाच्या मराळमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेजेल मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - New Year 2025 Wishes: नवीन वर्षाच्या Quotes, WhatsApp Messages, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा खास शुभेच्छा)
नवीन वर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा -
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला
सर्व काही मिळो
जे तुम्हाला मनापासून हवं आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्य ही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाती जपली की सगळं काही जमतं,
हळूहळू का होईना..
कोणी आपलंसं बनतं
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
मैत्रीचं नातं आयुष्यात
खूप काही शिकवून जातं.
हॅपी न्यू इअर!
एक एक दिवस मंतरलेला,
नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे,
आकांक्षांचे नवे वारे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे..
आपणांस व आपल्या परीवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली?
सुमारे 5,000 वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांनी 12 दिवस नवीन वर्ष साजरे केले. यादरम्यान, ते एकमेकांचे अभिनंदन करत वेळेवर कर भरतील असे वचन देतात. नवीन वर्षात संकल्प घेण्याच्या रूपाने ही परंपरा आजही जिवंत आहे. बॅबिलोनियन सभ्यतेमध्ये, 8 दिवसांचा आठवडा आणि 310 दिवसांचे वर्ष मानले जात असे. त्या कॅलेंडरमध्ये 10 महिने होते. त्याच वेळी, चीनमध्ये, नवीन वर्षाचे संकल्प करणे हे भाग्याचे लक्षण मानले जात असे. हजारो वर्षांपूर्वी, चिनी लोक त्यांचे जीवन सुधारण्यासाठी नवीन वर्षावर विशेष संकल्प करायचे. चीनमध्ये ही परंपरा आजही कायम आहे.