Vasu Baras 2023 Wishes In Marathi: कार्तिक महिना सुरू होताच सणांना सुरुवात होते. हिंदू धर्मात दसरा, वसुबारस, दिवाळी, धनत्रयोदशी हे सर्व प्रमुख सण आहेत. या सगळ्यामध्ये रमा एकादशीनंतर गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक कृष्ण पक्षाच्या द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. गोवत्स द्वादशी व्रत दरवर्षी धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला पाळले जाते. यावेळी हे विशेष व्रत 9 नोव्हेंबर, गुरुवार रोजी पाळण्यात येणार आहे.
काही ठिकाणी याला बच्च बारस तर गुजरातमध्ये वाघ बारस असेही म्हणतात. या दिवशी गाय आणि वासरांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत पाळतात. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. त्यामुळे लोक एकमेकांना या दिवसापासून शुभेच्छा देतात. तुम्ही देखील वसुबारस निमित्त HD Images, Wallpapers, Greetings च्या माध्यमातून तुमच्या मित्र-परिवारास द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने)
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.
गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
इडा पिडा ही टाळावी दुःख दारिद्र्य जळावे
सुखा समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा…
हिंदू धर्मात हा सण पुत्रप्राप्तीसाठी साजरा केला जातो. या दिवशी गाय, वासरू, वाघ किंवा वाघिणीच्या मूर्ती ओल्या मातीपासून बनवून जमिनीवर ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गायीचीदेखील पूजा केली जाते.