Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

Vasu Baras 2023 HD Images: दिवाळी (Diwali) चा सण का साजरा केला जातो? हे सर्वांना माहीत असले. परंतु, अनेकांना याची सुरुवात गायींच्या पूजेने होते हे माहीत नाही. वसु बारस (Vasu Baras 2023) हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे. या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जातो. हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असेही संबोधले जाते. तथापि, हा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण गायी आणि वासरांच्या सन्मानाशी संबंधित आहे.

वसुबारसच्या दिवसाने दिवाळीची सुरूवात होते. त्यामुळे या दिवसांपासून लोक एकमेकांना वसुबारस आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील SMS, Wishes, Wallpapers, Greetings शेअर करत तुमच्या मित्र-परिवारास खास मराठी वसुबारस शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (वाचा - Gold Buying Tips On Dhanteras: धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी)

अभ्यंग स्नानाने उजळेल तन मन

सुखाने नाहतील दिवाळीचे क्षण…

वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

वसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

दिवाळीचा पहिला दिवस

वसूबारस निमित्त शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

वसुबारसच्या आपणास आणि आपल्या कुटुंबास

हार्दिक शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Vasu Baras 2023 HD Images (PC - File Image)

 

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर माता यशोदा यांनी या दिवशी मातेचे दर्शन घेऊन तिची पूजा केली. तेव्हापासून या दिवशी गाय आणि वासरू या दोघांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी उपवास करून गाय आणि वासराची पूजा केल्याने जीवनात सुख प्राप्त होते.