
Gita Jayanti 2022 Messages: हिंदू धर्मात अनेक पुराणे, वेद आणि ग्रंथ आहेत. परंतु 18 महापुराणांमध्ये श्रीमद भागवत गीता महत्त्वाची मानली जाते. श्रीमद भगवद गीता कर्मयोग, भक्ती योग आणि ज्ञानयोगाचा उपदेश करते. म्हणूनच असे म्हणतात की, गीता पाठ करणाऱ्या व्यक्तीला जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. यासोबतच हा एकमेव ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते. श्रीमद भागवत हा महाभारताचा भाग आहे. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये कुरुक्षेत्रात महाभारत युद्ध झाले, तेव्हा कौरव सैन्य पाहून अर्जुन उदास झाला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला. हा दिवस मार्गशीष शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता. म्हणून दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी केली जाते.
हिंदू धर्मात गीता ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. सर्व पुस्तकांमध्ये हे एकमेव पुस्तक आहे ज्याची जयंती साजरी केली जाते. याचे कारण असे आहे की, इतर जवळपास सर्व धर्मग्रंथ ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत. परंतु गीता शास्त्र श्रीकृष्णाच्या शिकवणीवर आधारित आहे. यामध्ये श्रीकृष्णाने जीवन आणि मृत्यूचे गहन रहस्य सांगितले आहे. गीता जयंती निमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारा Wallpapers, Images, SMS, Quotes, Wishes च्या माध्यमातून खास मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील गीता जयंती प्रतिमा डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Dnyaneshwari Jayanti 2022: ज्ञानेश्वरी जयंती निमित्त जाणून घ्या संत ज्ञानेश्वरांच्या 'भवार्थ दीपिका' ग्रंथाबद्दल खास गोष्टी!)
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या
कधीही स्व: इच्छेने स्वत:ला उध्वस्त करु नका
हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गीतेत लिहिले आहे
निराश होऊ नकोस
कमजोर तुझी वेळ आहे
तू नाहीश्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलेला दिवस आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसाची चिंता करु नका
कारण जे होणार ते आजच होईल
जे काही होते ते चांगल्यासाठीच होते
त्यामुळे वर्तमानकाळाचा आनंद घ्या
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो
जसा तो विश्वास ठवतो
तसेच तो बनतो
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

यासोबतच गीता हा असा ग्रंथ आहे ज्याच्या उपदेशात अनेक समस्यांचे निराकरण दडलेले आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्णाच्या शिकवणीने महाभारताचे युद्ध जिंकणे शक्य झाले होते, त्याचप्रमाणे गीतेच्या ज्ञानाने माणूस कठीण प्रसंगांवरही विजय मिळवू शकतो.