Lord Ganesha (फोटो सौजन्य - Pixabay)

Sankashti Chaturthi March 2025: मराठी नववर्ष (Marathi New Year 2025) सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. प्रत्येक वर्षात काही महत्त्वाचे सण आणि व्रत पाळले जातात. यापैकीचं एक म्हणजे संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2025). हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व आहे. पुढील काही दिवसात मराठी नववर्ष सुरू होईल. त्यामुळे आता मराठी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी कधी आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज म्हणजेचं 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येत आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थी (Bhalachandra Sankashti Chaturthi) हा भगवान गणेशाला समर्पित एक महत्त्वाचे हिंदू व्रत आहे, जे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरे केले जातो, जे आज म्हणजेच 17 मार्च 2025 रोजी साजरे होत आहे. हे व्रत वर्षभर साजरा केल्या जाणाऱ्या अनेक संकष्टी चतुर्थींपैकी एक आहे. भगवान गणेशाच्या भक्तांमध्ये भालचंद्र संकष्टीला विशेष स्थान आहे. हे व्रत प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारतातील इतर भागात पाळण्यात येते.

फाल्गुन संकष्ट चतुर्थी तारीख, शुभ मुहूर्त -

  • फाल्गुन संकष्टी चतुर्थी तारीख - सोमवार, 17 मार्च 2025
  • फाल्गुन संकष्टी चतुर्थी प्रारंभ: सोमवार, 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 07 वाजून 32 मिनिटे.
  • फाल्गुन संकष्टी चतुर्थी समाप्ती: मंगळवार, 18 मार्च 2025 रोजी रात्रौ 10 वाजून 07 मिनिटे.

फाल्गुन संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी -

भगवान गणेशाला अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) म्हणून पूज्य मानले जाते. भाविक संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा करतात जेणेकरून त्यांना येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर किंवा अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचा दैवी हस्तक्षेप मिळेल. नवीन उपक्रम सुरू करणाऱ्या किंवा वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडथळ्यांवर मात करू इच्छिणाऱ्यांसाठी हा दिवस विशेषतः अर्थपूर्ण आहे. या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्याने भक्तांना आध्यात्मिकरित्या स्वतःला शुद्ध करण्यास आणि शांती आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत होते असे मानले जाते.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ -

मुंबई- 09:20 PM

ठाणे - 09:19 PM

पुणे - 09:15 PM

रत्नागिरी - 09:15 PM

कोल्हापूर - 09:11 PM

सातारा - 09:13 PM

नाशिक - 09:17 PM

अहिल्यानगर- 09:12 PM

धुळे रात्री- 09:14

जळगाव रात्री- 09:11

वर्धा रात्री- 08:58

यवतमाळ रात्री - 09:00

बीड रात्री 09:08

सांगली रात्री 09:10

सावंतवाडी रात्री- 09:12

सोलापूर रात्री- 09:05

नागपूर रात्री- 08:57

अमरावती रात्री- 09:02

अकोला रात्री- 09:05

छत्रपती संभाजीनगर रात्री- 09:01

भुसावळ रात्री- 09:10

परभणी रात्री- 09:04

नांदेड रात्री- 09:01

धाराशिव रात्री- 09:06

भंडारा रात्री- 08:55

चंद्रपूर रात्री- 08:54

बुलढाणा रात्री- 09:08

मालवण रात्री- 09:14

पणजी रात्री- 09:11

बेळगाव रात्री- 09:09

इंदूर रात्री- 09:12

ग्वाल्हेर रात्री- 09:08

हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार, मावळणारा चंद्र नकारात्मकता आणि भूतकाळातील कर्म काढून टाकण्याशी संबंधित आहे. संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो. हा उपवास सामान्यतः सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पाळला जातो आणि चंद्र पाहिल्यानंतर गणेश भक्त आपले व्रत सोडतात.