Representational Image (Photo Credits: Pixabay)

आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day 2020) साजरा होत आहे. महिलांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करणारा हा दिवस सर्वत्र अभिमानाने साजरा केला जातो. परंतु, अनेकांना या दिवशी 'पुरुष दिन' (International Men's Day) नेमकी कधी साजरा केला जातो? असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे या दिवशी हजारो लोक गुगलवर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आहे? याचा शोध घेतात. तुम्हीही याच प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या लेखातून देणार आहोत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मार्च महिन्यात 8 तारखेला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी ट्विटवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा ट्रेंड असतो. या दिवशी पुरुष स्त्रीयांना महिला दिनाच्या शुभेच्छा, संदेश किंवा कोट शेअर करतात. (हेही वाचा - International Women’s Day 2020: स्नेहा मोहन दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून केलं पहिलं ट्विट)

जागतिक महिला दिनाच्या दिवशी अनेक युझर्स गुगल सर्च इंजिनवर 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा केला जातो?' हे सर्च करतात. 19 नोव्हेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक पुरुष दिवस साजरा केला जातो. पुरुषांच्या प्रश्नांवर, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पुरुषांच्या आत्महत्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या चळवळीच्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली. तेव्हापासून 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्यालाही महत्त्व प्राप्त झालं. दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी एक वेगळी थीम असते. जगभरात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजित केले जाते.