Dhanteras 2022 (PC - File Image)

Dhanteras 2022 Date: हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 ते 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत सुरू होईल. अशा परिस्थितीत 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करणे शुभ ठरेल. तर 22 ऑक्टोबरला यमदीप दहन करणे शुभ असेल. धनतेरस 2022 ची अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात...

धनतेरस 2022 शुभ मुहूर्त -

  • कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी सुरू होते - 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 6.02 पासून
  • कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी समाप्ती - 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6.03 पर्यंत
  • पूजेसाठी शुभ वेळ - रविवार, 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5:44 ते 6.05 पर्यंत
  • प्रदोष काल : संध्याकाळी 5.44 ते रात्री 8.16 पर्यंत.
  • वृषभ काल : संध्याकाळी 6:58 ते रात्री 8:54.

धनत्रयोदशीला शुभ योग -

धनत्रयोदशी 2022 ला शुभ योग देखील तयार होत आहे. याचा अनेकांना फायदा होईल. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. (हेही वाचा - Surya Grahan 2022 Date and Timings: 25 ऑक्टोबर दिवशी सूर्यग्रहण; भारतात कधी दिसणार ग्रहण, वेध पाळण्याचा कालावधी काय? घ्या जाणून)

धनत्रयोदशीचे महत्त्व -

धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. धर्मग्रंथानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी प्रकट झाल्याचे मानले जाते. म्हणूनच या दिवशी तिन्ही देवतांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी सोने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

डिसक्लेमर -

या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.