
Ramadan 2024 Iftar & Sehri Timetable: रमजान (Ramadan 2024) चा पवित्र महिना 11 मार्च 2024 रोजी मध्य पूर्व आणि जगाच्या काही भागांमध्ये सुरू झाला. पण पाकिस्तान, बांगलादेश सारख्या दक्षिण आशियाई देशांसह भारतात हा पाक महिना 12 मार्च 2024 रोजी सुरू झाला आहे. सुमारे 30 दिवस चालल्यानंतर 9 एप्रिल 2024 रोजी रमजान संपेल. रमजानमध्ये, उपवास करणारे लोक अल्लाहची पूजा करतात आणि दिवसातून पाच वेळा प्रार्थना करतात.
यासोबतच ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही न खाता-पिता उपवास करतात. सेहरी (Sehri) सूर्योदयापूर्वी होते ज्यामध्ये उपवास सुरू करण्यापूर्वी अन्न आणि पेय सेवन केले जाते. यासोबतच सूर्यास्तानंतर इफ्तार (Iftar) होते, ज्यामध्ये उपवास सोडतात. राज्यात जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी सेहरी आणि इफ्तार कधी होणार हे खालील तक्त्यात नमूद करण्यात आलं आहे. तुम्ही खाली दिलेल्या वेळेनुसार, सेहरी आणि इफ्तारच्या वेळा पाहू शकता. (वाचा - Kharmas 2024: खरमासची सुरुवात कधीपासून होणार? जाणून घ्या तारीख)
जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई मधील सेहरी आणि इफ्तारचे वेळापत्रक -





मुंबईत सेहरी खाण्याची वेळ पहाटे 5.35 वाजता संपेल. इफ्तारची वेळ म्हणजेच रोजा संध्याकाळी 6.48 वाजता सोडला जाईल. नवी दिल्लीत सेहरीची वेळ सकाळी 05:04 आहे आणि इफ्तारची वेळ संध्याकाळी 06:40 आहे. जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी सेहरी आणि इफ्तारची वेळ एक मिनिटाने वाढेल किंवा कमी होईल.