महाराष्ट्रामध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस (Vidyarthi Divas) म्हणून साजरा केला जातो. महामानव म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी खडतर प्रवास पूर्ण करत आपले शिक्षण पूर्ण केले. दलित समाजालाही त्यांनी आपल्या शिकवणीमधून शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा मूलभूत मंत्र दिला आहे. दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांनी शाळेत प्रवेश केलेल्या दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अतिशय हुशार, कुशाग्र, तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर 7 नोव्हेंबर 1900 रोजी शालेय जीवनास सुरुवात केली. म्हणून हा दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. मग शिक्षणाप्रती आस्था असलेल्या या महामानवाच्या स्मृती निमित्त साजरा केला जाणारा विद्यार्थी दिवस तुमच्या प्रियजणांसोबतही काही मेसेजेस शेअर करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावण्यासाठी आजच्या दिवशी विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्छा देणारी ही काही ग्रिटिंग्स नक्की शेअर करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्रात विद्यार्थी दिन हा 7 नोव्हेंबरला साजरा करण्याची पद्धत आहे. तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबर दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो. हा दिवस विश्व विद्यार्थी दिवस म्हणून देखील ओळखला जातो.