Vasubaras 2024 Wishes In Marathi (File Image)

Vasubaras 2024 Wishes In Marathi: महाराष्ट्रात आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस (Vasubaras 2024) सण साजरा केला जातो. याच दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा 28 ऑक्टोबर 2024 रोजी वसुबारस साजरी होणार आहे. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून वसुबारस दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.

घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया या दिवशी उपवासही करतात.

तर अशा या वसुबारसनिमित्त Wishes, HD Images, Wallpapers, Greetings, Messages च्या माध्यमातून द्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. (हेही वाचा: Diwali 2024 Rangoli Designs: दिवाळीसणानिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ)

Vasubaras 2024 Wishes In Marathi
Vasubaras 2024 Wishes In Marathi
Vasubaras 2024 Wishes In Marathi
Vasubaras 2024 Wishes In Marathi
Vasubaras 2024 Wishes In Marathi

दरम्यान, या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे. वसुबारस दिवशी ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत.