व्हॅलेंटाईन आठवडा सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत आपण यंदाचा व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) संस्मरणीय बनविण्यासाठी काहीतरी नियोजन केलेच असेल. 14 फेब्रुवारीचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक जोडपी आपले प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करतात. या दिवशी काही लोक त्यांच्या जोडीदारास एखादी सुंदर भेटवस्तू देतात. तर काही लोक जोडीदारासाला सरप्राईज देतात. असेही काही लोक आहेत जे, व्हॅलेंटाईन डेला संस्मरणीय बनविण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जातात.
तुम्हाला गर्दीपासून दूर राहून एखाद्या सुंदर ठिकाणी, आपल्या जोडीदाराबरोबर काही रोमँटिक क्षण साजरे करायचे असतील आणि व्हॅलेंटाईन डे खास बनवायचा असेल, तर या 5 रोमँटिक हॉलिडे टिप्स आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
मोकळ्या आकाशाखाली -
व्हॅलेंटाईन डे हा एक खास दिवस आहे, जर आपण आपल्या साथीदारासह तो एका मोकळ्या आकाशात चमकणार्या तार्यांखाली साजरा केलात तर? फक्त आपण दोघेच आणि व्यक्त होणारे प्रेम. होय, आपण आपल्या जोडीदारासह यासारखी काहीतरी योजना आखू शकता. बर्याच ट्रॅव्हल एजन्सीज जोडप्यांसाठी व्हॅलेंटाईन डेसाठी खास कॅम्पिंग देखील आयोजित करतात, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन डेला खुल्या आकाशाखाली संस्मरणीय बनवू शकता.
ट्रेकिंग -
आपण आणि आपला जोडीदार थोडे धाडसी प्रेमी असल्यास, आपण व्हॅलेंटाईन डेला ट्रेकिंग वर जाऊ शकता. अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची मजा काही औरच आहे. ट्रेकिंगशिवाय, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, बंजी जंपिंग अशा अनेक साहसी खेळांद्वारे, आपण आपल्या व्हॅलेंटाईनसमवेत प्रेमाचा हा दिवस खास बनवू शकता.
ड्राइव्हवर जा -
जर आपल्याला शहरापासून दूर, शांत ठिकाणी जोडीदारासह व्हॅलेंटाईन साजरा करायचा असेल किंवा त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवायचा असेल, तर आपण दूरच्या ड्राईव्हवर जाऊ शकता. दोघेच निसर्गाच्या सौंदर्याने भरलेल्या सुंदर ठिकाणी जा. लाँग ड्राईव्ह दरम्यान आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत आपल्या प्रेमाने हा दिवस आनंदाने साजरा करा.
समुद्रकिनारी डिनर डेट -
व्हॅलेंटाईन डे हा रसिकांसाठी खूप खास दिवस आहे. जर आपण आपल्या मैत्रिणीला किंवा प्रियकराला, खुल्या आकाशाइतके आणि दूरवर पसरलेल्या समुद्राइतके प्रेम करत आहोत ही गोष्ट सांगायची असल्यास, त्यांना व्हॅलेंटाईन डे वर समुद्रकिनारी डिनर डेटला घेऊन जा. लाटांच्या आवाजासोबत, थंड हवेत, मोकळ्या वाळूत तुम्ही हा प्रेमाचा दिवस साजरा करा.
ट्री हाऊस मध्ये रहा -
व्हॅलेंटाईन डेला अनेक जोडी बाहेर फिरायला जातात, एखाद्या रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करतात. परंतु जर तुम्हाला आपल्या व्हॅलेंटाईनसाठी एखादी रोमँटिक सुट्टी संस्मरणीय करायची असेल, तर ट्री हाऊसमध्ये मुक्काम करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. शहरापासून दूर असलेल्या निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या ट्री हाऊसमध्ये तुम्ही तुमच्या प्रेमाला नवीन उजाळा देऊ शकता. (हेही वाचा: 'रोज डे' निमित्त आपल्या जोडीदाराला गिफ्ट देण्यासाठी या भन्नाट आयडियाज ट्राय करुन Valentine Day सप्ताहाची करा रोमँटिक सुरुवात)
तर, या काही रोमँटिक हॉलिडे टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला व्हॅलेंटाईन डे रोमँटिक आणि संस्मरणीय बनवू शकता. व्हॅलेंटाईन डे नंतर लगेच शनिवार व रविवार आहे, अशा परिस्थितीत आपण आपल्या जोडीदारासह दोन-तीन दिवसांची सुट्टीची योजना आखू शकता आणि व्हॅलेंटाईन डे एका खास पद्धतीने साजरा करू शकता.