Valentine Week 2023 Calendar: कधी आहे रे! रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, टेडी डे, हग डे, किस डे आणि लाडका व्हॅलेंटाईन डे?
Valentine Week 2023 Calendar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

व्हॅलेंटाईन वीक 2023 (Valentine Week 2023) अगदी तोंडावर आला आहे. तोंडावर आला आहे म्हणजे अगदीच जवळ आला आहे. अवघ्या काही दिवसांवर. जगभरातील अनेक प्रेमी युगुलं ज्याला 'लव्ह बर्ड' (Lovebirds) असेही म्हटले जाते. 'लव्ह बर्ड' सदरात मोडणारी ही मंडळी एकमेकांप्रती असलेले आतीव प्रेम अत्यानंदाने व्यक्त करण्यासाठी अतुरलली असतील. आगोदरच एकमेकांच्या प्रेमात असलेली अनेक जोडपी या काळात कदाचित अधिक जवळीक निर्माण करतील. तर काही मंडळी आपल्या प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतील. अर्थात, त्याचा स्वीकार होईल की नाही हे तो क्षणच ठरवेल. पण असो. इथे आपण बोलणार आहोत व्हॅलेंटाईन सप्ताह (Valentine Week 2023 Calendar) म्हणजेच व्हॅलेंटाईन विक कॅलेंडरबद्दल. अर्थात दिनदर्शिका. होय, संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकमध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) पूर्वी येणारे रोझ डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day),चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Promise Day), आलिंगन दिवस (Hug Day), चुंबन दिवस (Kiss Day) याबद्दल तारीखवार माहिती आम्ही येथे देणार आहोत. इच्छुक (!) ती जाणून घेऊ शकतात.

तर मंडळी! यंदाचा सालाबादप्रमाणे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीतच येणार आणि पारही पडणार आहे. त्यासंदर्भात तुम्ही जर यादी आणि कॅलेंडर शोधत असाल तर सर्व माहिती खाली दिली आहे. तीसुद्धा दिवसांनुसार. घ्या जाणून. (हेही वाचा, Valentine’s Day 2023 Gift Ideas: जोडीदाराला द्या हटके गिफ्ट, दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाईन डे)

व्हॅलेंटाईन वीक 2023 कॅलेंडर (Valentine Week 2023 Schedule)

रोझ डे (Rose Day)

व्हॅलेंटाईन आठवडाच मुळात सुरु होतो 7 फेब्रुवारी म्हणजेच रोज डे पासून. या दिवशी जोडीदार एकमेकांना प्रेमाचे प्रतीक म्हणून एक गुलाबाची फुलं देतात. हे फूल एकमेकांप्रती असलेल्या प्रेमाचा सूगंध दर्शवते. जणू या फुलाच्या माध्यमातून एकमेकांप्रती असलेल्या उत्कट भावभावनांनाच वाट मोकळी करुन दिली जाते.

प्रपोज डे (Propose Day)

तुम्हाला जर एखाद्याप्रती असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा दिवस खास त्यासाठीच असल्याचे मानले जाते. व्हॅलेंटाईन विकमध्ये 8 फेब्रुवारी 2023 हा दिवस प्रपोज डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी सोबत राहण्याबाबत विचारु शकता.अर्थात हे सगळे आपण काहीसे अंदाज (समोरच्याचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा) घेऊनच करा. तुमच्या प्रेमाचा स्वीकार झाला तर ठिक. नसेल तर नकार पचविण्याचीही ताकद ठेवा. आणि हो.. जर समोरच्याबाबत खात्री असेल तर, तुम्हाला रोमँटिक डिनरची व्यवस्था करावी लागेल आणि मगच तुमच्या प्रियजनांना प्रपोज करावे लागेल. हे थोडेसे नाटकी अथवा फिल्मी होईल. पण, प्रेमात सगळं माफ.

चॉकलेट डे (Chocolate Day)

व्हॅलेंटाईन वीक मधला तीसरा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी. जो चॉकलेट डे म्हणून साजरा करतात. खरेतर जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकराला चॉकलेटचा बॉक्स किंवा चॉकलेट प्रेमाने देता, तेव्हा तो काहीसा अधिक प्रभावकारक घटक ठरतो. कारण आजच्या काळात चॉकलेट्स शेअर केल्याने तुमचं नातं घट्ट होतं असं मानलं जातं. अर्थात जी मंडली रोमँटीक असतात तेच असले काही प्रकार करत असतात.

टेडी डे (Teddy Day)

व्हॅलेंटाईन वीकला आता कुठे बहर चडू पाहतो. कारण आता तर कुठे या विकमधील चौथा दिवस म्हणजे 10 फेब्रुवारी उजाडलेला असतो. ज्याला टेडी डे म्हणून ओळखले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला (खास करुन मुलीला) डेडी बेअर देऊ शकता. या टेडीला तुमचा प्रियकर जेव्हा जेव्हा मिठी मारेल तेव्हा तेव्हा त्याला तुमची आठवण येईल. खास करुन तुम्ही सोबत नसताना. ज्यामुळे त्याला तुम्ही सदैव त्याच्यासोबत असल्याची भावना निर्माण होऊ होईल.

प्रॉमिस डे (Promise Day)

प्रॉमिस डे दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी येतो. या दिवशी जोडीदारासोबत अनेक आणाभाका घेतल्या जातात. एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले घेतले जाते. जोडीदाराच्या आयुष्यासी जोडून घेण्याचा हा एक प्रभावी मार्गही अनेकांनाठी ठरु शकतो.

आलिंगन दिवस (Hug Day)

व्हॅलेंटाईन वीकच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये येणारा हा दिवस. जो 12 फेब्रुवारी रोजी येतो आणि हग डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना मिठीत घेतात. प्रेमाणे एकमेकांना मिठी मारतात. प्रियकराला उबदार, घट्ट आणि प्रेमळ मिठी देऊन प्रेम व्यक्त करण्याचा हा एक अतिशय सुंदर मार्ग आहे.

चुंबन दिवस (Kiss Day)

व्हॅलेंटाईन वीक वेळापत्रकानुसार चुंबन दिवस म्हणजेच किस डे हा शेवटून दुसरा दिवस आहे. पाठिमागच्या आठवडाभरात निर्माण झालेली जवळीक तुमच्यातील नाते अधिक दृढ करते. जेणेकरुन जोडीदार एकमेकांना चुंबन देण्या-घेण्यास राजी होतात. चुंबन दिवस म्हणजे आपल्या नातेसंबंधाला अधिक घनिष्ठता प्रदान करणे. यामध्ये तुम्हाला चुंबन प्रतिबद्धता आणि जवळीकता दिसून येते.

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन विकमधील सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. जो 14 फेब्रुवारी 2023 रोजी येतो. अनेकांच्या दृष्टीने आणि व्हॅलेंटाईन विकमधील आणि वर्षभरातीलुद्धा हा सर्वात रोमँटिक दिवस आहे. ज्या दिवशी जोडीरांकडून एकमेकांना विपूल प्रमाणात प्रेम दिले-घेतले जाते. व्हॅलेंटाईन वीक (2023) च्या शेवटच्या दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डे रोजी तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी अविस्मरणीय भेटवस्तू किंवा रोमँटिक लंच अथवा तुमच्या जोडीदारासोबत एक मनोरंजक संस्मरणीय सहलीचे आयोजन करू शकता. याशिवाय तुम्ही जोडीदाराला आडेल अशी कोणतीही कृती करु शकता. अर्थात जोडीदाराच्या संमतीनेच बरं!