
सध्या जगभरात ‘व्हॅलेंटाईन वीक’ (Valentines Week) म्हणजेच प्रेमाच्या आठवड्याचे वारे वाहत आहेत. आज या वीकमधील ‘किस डे’ (Kiss Day) साजरा होत आहे. किस... चुंबन ही नात्यातील खूप उत्कट भावना आहे, जिथे प्रेमी युगुल शारीरिकदृष्ट्या जवळ येऊन प्रेमाच्या आणाभाका घेतात. अनेकांसाठी ही नात्यातील सर्वात रोमँटिक गोष्ट असते, जिथून तुमचे नाते बहरण्यास सुरुवात होते. रोज डे, हग डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, टेडी डे अशा 5 दिवसानंतर ‘किस डे’दिवशी चुंबनाद्वारे तुम्ही तुमची भावना व्यक्त करता. एका किसमधून एकमेकांप्रती प्रेम, सन्मान, आदर या भावना व्यक्त होतात.
या दिवशी अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर, माथ्यावर, ओठावर किस करुन तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तुमचे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या बंधावर ही गोष्ट अवलंबून आहे. मात्र जर का तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या ओठावर किस करत असाल तर त्यासाठी आधी परवानगी जरूर घ्या. किस ही गोष्ट तुम्हाला अजून जवळ घेऊन येऊ शकते किंवा तुम्हाला दुरही लोटू शकते. तर अशा खास दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही Images, WhatsApp Messages, Wishes, Greetings, HD Images शेअर करून देऊ शकता.





दरम्यान, किस डेला फक्त ओठावरच किस करायला पाहिजे असे नाही. गालावर, माथ्यावर, मानेवर, हाताला असा अनेक ठिकाणी किस करून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. जवळच्या व्यक्तीला केलेला किस तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही फायदेशीर आहे.