Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना 'या' गोष्टी केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या होतील दूर
तुळशी वृंदावन (representative images)

Tulsi Vivah 2019: हिंदू धर्मात दिवाळीच्या सणानंतर काही दिवसांत तुळशी विवाह करण्याती पद्धत आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. तुळशी विवाह पार पडला की, लग्नाच्या तारखा काढायला सुरुवात होते. त्यामुळे अनेक मंडळी तुळशी विवाहाची वाट पाहून असतात. विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं खूप गरजेचं आहे. तुळशी विवाह केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

यावर्षी 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही काही समस्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी खालील गोष्टी केल्यास त्या दूर होतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात सुख आणि शांती लाभेल. चला मग जाणून घेऊयात या कार्याविषयी...(हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना ‘या’ गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ)

तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ काम –

  • तुम्हाला पाहिजे तसा पती मिळण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करा. विवाह संपल्यानंतर ही ओढणी कायम तुमच्याकडे राहूद्या. असं केल्याने तुम्हाला हवा तसा पती मिळेल.
  • तुळशी समोरील शाळीग्राम देवतेला तिळ अर्पण करा.
  • शाळीग्राम देवतेला दुधामध्ये हळद भिजवून लावा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.
  • तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर तुळशी वृंदावनाला 11 वेळा परीक्रमा घाला.
  • तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने तुळशीच्या रोपाखाली तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सुख येईल.
  • तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नेहमी भांडण होत असेल, तर तुळशी विवाह झाल्यानंतर 'ऊं नमों भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा. याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल.
  • पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम कमी होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुळशी विवाहाच्या दिवशी तुमच्या बेडरुममध्ये राधा कृष्णचा फोटो लावा, असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.
  • महिलांना आपल्या वैवाहिक जीवनात सुख हवे असेल तर, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच दिवा लावून झाल्यानंतर विष्णूच्या नावाचा जप करा.
  • एखाद्या मुलीचे लग्न जमत नसेल तर तुळशीच्या विवाहाच्या दिवशी पिवळ्या कपड्यात हळद, केसर, गुळ आणि हरभऱ्याची दाळ बांधून तो कपडा भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास केल्याने पुरुषाचे लग्न लवकर जमण्यास मदत होते.
  • तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची 11 पाने आणि भगवान विष्णूची मूर्ती आपल्या बेडरुममध्ये ठेवा. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरील प्रेम वाढण्यास मदत होईल.
  • तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडून ती पाण्यात टाका. हे पाणी घराच्या दरवाजावर शिंपडा. असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट नजर असलेल्या शक्ती नष्ट होतील.

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका

तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही. तुळशी विवाहावेळी तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते. तसेच तुळशीभोवती ऊस, झेंडूची फुले, आवळा, चिंच आदींची मांडणी केली जाते. तसेच तुळशी रुंदावणासमोर आकर्षक रांगोळीही काढली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)