Tukaram Beej 2021 Images: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस !
Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)

Tukaram Bij 2021 Photos: संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदा 30 मार्च रोजी तुकाराम बीज साजरी होणार आहे. या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहु गावात झाला. पंढरपूरचे विठ्ठू माऊली हे हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. Tukaram Beej 2021: तुकाराम बीज निमित्त आज आळंदी मध्ये अवतरली देहूनगरी; पहा फोटोज.

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला खालील ईमेज उपयोगात येतील. (Tukaram Beej 2021: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये संचारबंदीचे आदेश; फक्त 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार 'तुकाराम बीज' सोहळा)

Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)
Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)
Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)
Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)
Tukaram Beej 2021 HD Images (Photo Credit- File Image)

तुकाराम महाराज हे वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत म्हणून ओळखले जातात. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले.