Teacher's Day Gift Idea: शिक्षक दिनानिमित्त 'या' काही भेटवस्तू देऊन गुरुंना देत व्यक्त करा तुमच्या भावना
Teacher's Day Gift Idea (Photo Credits: YouTube grab)

Teacher's Day Gift Idea:   आपल्याला जन्म आपल्या आई -वडिलांकडून मिळतो. पण आपल्याला जीवन जगण्यासाठी  यशस्वी होण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश  हा आपल्याला गुरुंकडून मिळतो. म्हणून गुरुला देवाचे स्थान दिले गेले आहे.  शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांना उज्ज्वल भविष्याचे निर्माते देखील म्हटले जाते. कारण ते मुलांना त्यांच्या शिक्षणासह चांगल्या भविष्यासाठी तयार करतात. याच कारणास्तव शिक्षकांच्या सन्मानार्थ 'शिक्षक दिन' हा सणासारखा धूमधडाक्याने साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसाठी सरप्राईजचे नियोजन करतात आणि त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानतात.

खरं तर, कोरोनाव्हायरस महामारीमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे इतर सणांप्रमाणे शिक्षक दिनाचा  आनंद कुठेतरी हरवल्यासारखा वाटत आहे. परंतु तुम्ही निराश होऊ नका. मात्र तुम्ही आपल्या स्वतःच्या हातांनी बनवलेले काही विशेष ग्रीटिंग कार्ड किंवा एखादे शानसे गिफ्ट  देऊन आपल्या शिक्षकांचे आभार मानू शकता.(Teachers Day 2021: शिक्षक दिनानिमित्त राज्यात 'शिक्षक कार्य गौरव सप्ताह' राबवले जाणार)

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली, म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.