Swami Vivekananda Jayanti 2023 Images: स्वामी विवेकानंद जयंती यांच्यानिमित्त WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा व्यक्त करा कृतज्ञता
Swami Vivekananda Images | File Image

भारत देशासोबतच अनेक पाश्चात्य देशांमध्येही हिंदू धर्माचाप्रसार करणार्‍या श्री रामकृष्ण परमहंस (Sri Ramakrishna Paramahansa) यांचे शिष्य स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)  यांचा जन्म दिवस म्हणजे 12 जानेवारी. भारतात विवेकानंदांचा जन्मदिवस हा नॅशनल युथ डे (National Youth Day) अर्थात युवा दिवस  म्हणून देखील साजरा केला जातो. त्यांच्या स्मरणार्थ 1984 पासून हे सेलिब्रेशन केले जाते. मग यंदा तरूणांसाठी प्रेरणास्थान असलेल्या विवेकानंदांप्रती  तुमच्या भावना व्यक्त करत त्यांच्याकडून सकारात्मकता घेण्यासाठी सोशल मीडीयात WhatsApp Messages, Status, HD Images, Wishes, Greetings शेअर करत त्यांच्याप्रती कृतज्ञता अर्पण करू शकता.

स्वामी विवेकानंद यांचे 1893 मधील अमेरिकेच्या शिकागो मधील भाषण विशेष गाजले. तरूण पिढी हे देशाचं भवितव्य असल्याने त्यांच्यामध्ये रॅशनल थिंकिंग म्हणजेच तर्कसंगत विचार करण्याची वृत्ती निर्माण व्हावी हे या नॅशनल युथ डे म्हणजेच युवा दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. नक्की वाचा: Swami Vivekananda Jayanti 2023: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे 5 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे .

स्वामी विवेकानंद जयंती

Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image

 

विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. त्याच्या मार्फत हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरूवात केली. पश्चिम बंगाल मध्ये जन्मलेले नरेंद्र हे पुढे विवेकानंद झाले. वडील विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी 12 जानेवारी 1863 दिवशी जन्म घेतलेले 'नरेंद्र' प्रतिभासंपन्न होते. 4 जुलै 1902 दिवशी त्यांनी कोलकत्ता मधील बेलूर मठात समाधी घेतली.