Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti 2023) दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2023) म्हणून साजरी केली जाते. हा दिन 12 जानेवारी रोजी येतो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विवेकानंद यांच्या विचारांना माणणारे लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात. शिवाय, विविध कार्यक्रमांमधून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. आपणही त्यांच्या जयंतीनिमित्त काही विचार जाणून घेऊ सकता. जे आपल्याला सदैव प्रेरणा देऊ शकतील आणि आयुष्यात फायदेशीरही ठरु शकतील.

  • आपणच स्वत:ला आंतर्बाह्य विकसित केले पाहिजे. त्यासाठी दुसरे कोणी आपल्याला मदत करु शकत नाही किंवा तुमचे आध्यात्मिक रुपांतर करू शकत नाही. फक्त तुमचा आत्माच तुमचा प्रशिक्षक होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्या.
  • आयुष्यात काही मिळवायचे तर त्यासाठी गुरु आवश्यक. गुरुशिवाय कोणतेही ज्ञान प्राप्त होणे केवळ अशक्य. गुरु असेल तर तुम्ही कोणत्याही वादळातून बाहेर पडू शकतात. (हेही वाचा, Swami Vivekananda’s Quotes: स्वामी विवेकानंद यांचे तरूणाईला प्रेरणा देणारे विचार सोशल मीडीयात शेअर करत साजरा करा National Youth Day )
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा तुम्हाला इश्वरप्राप्ती नक्की होईल. स्वत:ला कमी लेखण्याहून अधिक निराशाजणक काहीच नाही.
  • जे लोक कधीच संधी घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत तेच आयुष्यात भरभराट करतात कारण ते अयशस्वी झाले तरी ते काहीतरी नवीन शिकतात.
  • प्रत्येक आव्हान ही एक संधी असते, ती तुमच्या समजुतीवर अवलंबून असते की तुम्हाला त्यात संधी दिसते की त्यात अडचण. त्यामुंळे कोणतीच संधी सोडू नका.
  • आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग म्हणजे अशी कल्पना असणे जी तुम्ही स्वप्न पाहू शकता, अनुभवू शकता आणि जगू शकता. जेव्हा तुमचे शरीर, मन आणि आत्मा या कल्पनेचा श्वास घेतील तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. अगदी लहान वयातच नरेंद्रनाथांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता. आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केल्यानंतर ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे वडील कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते आणि आई धार्मिक स्त्री होती. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ आणि त्याच्या अनेक शाखा केंद्रांवर दरवर्षी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस साजरा केला जातो