Surya Grahan 2021: यावर्षी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कधी असेल; जाणून घ्या संपूर्ण यादी
सूर्य ग्रहण 2021 (Photo Credits: Pixabay)

Surya Grahan 2021: आपल्या सर्वांना माहितच आहे की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दरवर्षी होते. हे पृथ्वी आणि चंद्राच्या गतीवर अवलंबून आहे. आज आम्ही आपल्याला या वर्षात किती सूर्यग्रहण होतील आणि किती चंद्रग्रहण होतील यासंदर्भात माहिती देणार आहोत. हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला येईल आणि कोठे दिसेल. या वर्षी एकूण दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असणार आहेत ते मे महिन्यापासून सुरू होतील आणि डिसेंबरपर्यंत चालतील. यापैकी 3 ग्रहण आपल्या देशात दिसू शकतात. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या तारखांबद्दल जाणून घेऊयात.

प्रथम सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी दिसेल -

10 जून रोजी वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होईल. हे अर्धवट सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण भारत, कॅनडा, रशिया, ग्रीनलँड, युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत दिसेल. (वाचा - Surya Grahan Pregnancy Precautions: गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या काळात कोणती काळजी घ्यावी?)

डिसेंबरमध्ये वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण -

या वर्षाचे दुसरे किंवा शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबरमध्ये होईल. हे दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण -

2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. हे चंद्रग्रहण भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशात दृश्यमान असेल. भारतात हे उपछाया ग्रहण असेल, तर इतर ठिकाणी पूर्ण चंद्रग्रहण असेल.

वर्षाच्या चंद्रग्रहणाची समाप्ती -

या वर्षाचे दुसरे किंवा शेवटचे चंद्रग्रहण 26 नोव्हेंबर रोजी होईल. हे आंशिक चंद्रग्रहण भारत, उत्तर युरोप, अमेरिका, पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलियामध्ये दृश्यमान असेल.