Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

Shiv Swarajya Din Messages in Marathi: न भूतो न भविष्यति असा रायगडावर झालेला 'शिवराज्याभिषेक सोहळा' (Shivrajyabhishek Sohala 2021) सर्वांच्या डोळ्यांचे पारणं फेडेल असा होता. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 6 जून ला सर्व शिवभक्त रायगडावर जमतात. हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 दिवशी झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा दिवस कुणीही विसरणार नाही असाच आहे. या दिवसाची आठवण म्हणून आज प्रत्येक शिवभक्त सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवभक्तांना सोशल डिस्टंसिंगचे भान पाळून मोठ्या संख्येने रायगडावर जाता येत नसले तरीही मेसेजेस, Facebook, WhatsApp Status द्वारे एकमेकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश

ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाट

त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट

डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Din 2021 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा आपल्या राजाचा अभूतपूर्व सोहळा

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस

मुघलांना वाटत होती ज्यांची भीती

असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती'

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

न भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा

या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा

या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन

शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!

Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,

सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,

शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास

ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती

पोवाडे, गौरव गीतांमधून

आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती  

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi (Photo Credits: File)

राज्याभिषेकादिवशी शिवरायांना 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान मिळाला. या दिवशी रायगड शिवभक्तांनी सजतो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करुन स्रागसंगीत पूजन होते. इतर कार्यक्रम पार पडतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता येत नसला तरीही प्रत्येकांनी शिवछत्रपतींनी दिलेली शिकवण कायम मनात ठेवून तसे वागले तर ते शिवछत्रपतींना अनोखी मानवंदना ठरेल.