Shivrajyabhishek Din 2021 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा आपल्या राजाचा अभूतपूर्व सोहळा
Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi: 'स्वराज्य' ह्या केवळ एकच विचाराने पेटून उठललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala 2021) हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या दिवशी तमाम शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन हा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. सारा आसंमत देखील या दिवशी भगव्याने झळाळून गेला असतो. यंदा कोरोनामुळे एकत्रितरित्या येऊन शिवभक्तांना हा उत्सव साजरा करता येत नसला तरीही आपण सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकतो.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status, Facebook, Greetings द्वारे देण्यासाठी तुम्हाला खास मराठी संदेशाची गरज भासेल. त्यामुळे तुमच्या शिवराज्याभिषेक दिनाचे खास शुभेच्छा संदेश

अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा

त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा

डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Din 2021 Date: यंदा शिवराज्याभिषेक सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून होणार साजरा; 6 जून रोजी रायगडावर निनादणार महाराजांचा जयघोष

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले

रायगडाचे माथे फुलांनी सजले... पाहुन सोहळा

'छत्रपती' पदाचा 33 कोटी देवही लाजले...

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास

स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस

त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…

पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …

अन साम्राज्य निर्माण करायचे असेल

तर “शिवबाचच” काळीज हवं...!!

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

Shivrajyabhishek Din 2021 Messages in Marathi (Photo Credits: File)

दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा पासून हा सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.