
महाराष्ट्रात आता 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा (Shivrajyabhishek Sohala Din) दिवस यंदाच्या वर्षापासून शिवस्वराज्य दिन (Shivswarajya Din) म्हणून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी शिवभक्त रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) मानाचा मुजरा करत त्यांच्या आयुष्यातील 'राज्याभिषेकाचा' हा खास दिवस आजही जल्लोषात साजरा करतात. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महाराजांना गडावर जाण्यासाठी निर्बंध आहेत. पण घरातच राहुन परिस्थितीचं भान राखून यंदा हा दिन तितक्याच जल्लोषात, आनंदात साजरा करण्यासाठी सज्ज होत असाल तर दिवसाची सुरूवात शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा सोशक मीडीयात फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्यावर मराठमोळे Quotes, Messages, Wishes, HD Images द्वारा देऊ शकता. त्यासाठी लेटेस्टलीच्या टीम कडून तयार करण्यात आलेली ही शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच डाऊनलोड करून शेअर करू शकता. Shivrajyabhishek Din 2021 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा आपल्या राजाचा अभूतपूर्व सोहळा.
यंदा राज्य सरकार महाराष्ट्रभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर स्वराज्य गुढी उभारून हा दिवस साजरा करणार आहे. यावेळी जरतरी पताक्यावर शिवाजी महाराजांच्या पाच शुभलक्षणांचा समावेश असलेला झेंडा फडकवला जाणार आहे. मग तुम्ही देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत घरामधूनच या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी
मानाचा मुजरा!

झेंडा स्वराज्याचा
झेंडा शिवराज्याचा
गर्जा महाराष्ट्र माझा
शिवस्वराज्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा

कोटी देवांची अब्जावधी मंदिरं असतात
पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या
हृद्यावर जे अधिराज्य गाजवतात त्यांना
'छत्रपती शिवराय' म्हणतात
शिवस्वराज्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा

प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज"
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

इतिहासामध्ये करण्यात आलेल्या नोंदीनुसार, 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला रायगडावर राज्यभिषेक सोहळा करून घेतला होता. हा सोहळा भव्यदिव्य आणि उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हिंदू पंचांगानुसार 1674 रोजी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेकाचा सोहळा पार पडल्यानंतर ते हिंदवी साम्राज्याचे छत्रपती झाले.