Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings (File Image)

शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)... महाराष्ट्राचे आराध्य दैवत! महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, इतिहास हा शिवाजी महाराजांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. किंबहुना आज आपण जो मोकळा श्वास घेत आहोत, तो फक्त शिवाजी महाराज यांच्यामुळेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज, शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांची जयंती (Shivaji Maharaj Jayanti 2022)  साजरी होत आहे. महाराजांच्याकडे एक आदर्श मुलगा, प्रेमळ पती, मायाळू मुलगा आणि सदैव रयतेसाठी झटणारा राज्यकर्ता म्हणून पाहिले जाते. प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंश, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

16 वे शतक, त्यावेळी उत्तरेला शहाजहान, विजापुरला आदिल शहा आणि गोलकोंडयाला कुतुबशहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तृगिजांच्या ताब्यात होते. अशावेळी रयतेला अत्याचारातून मुक्त करण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी महाराज जन्माला आले.

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. तर या खास दिवशी आपले कुटुंबीय, मित्र, जवळच्या लोकांना Facebook Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, GIFs, Images शेअर करून देऊ शकता शिवजयंतीच्या शुभेच्छा. (हेही वाचा: शिवजयंती निमित्त ऐका अंगावर शहारे आणणारे, शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे हे खास पोवाडे (Watch Video)

Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings
Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings
Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings
Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings
Shivaji Maharaj Jayanti 2022 Greetings

दरम्यान, शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेव, शाहिस्तेखान अशा अनेकांना धूळीत पाडले. 300 हून अधिक किल्ले जिंकून त्यांनी राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविले. त्यांनी गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला.

6 जुन 1674 ला गागाभट्ठ यांनी हिंदु परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला व खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची स्थापना होऊन, रयतेला लोककल्याकारी व न्यायप्रिय राजा मिळाला.