छत्रपती शिवाजी महाराज (फोटो सौजन्य-फेसबुक)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj),  महाराष्ट्राच्या भूमीत, जिजाबाईंच्या पोटी जन्म घेतलेला एक पराक्रमी राजा. त्यांच्या जन्माला येण्याने आणि जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवला आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत, इथल्या गड-किल्ल्यांवर त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. इथल्या मातीत महाराजांची शिकवण रुजली व आजही ती पुढच्या पिढीत हस्तांतरीत होत आहे. उद्या, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. कधी कथांच्या रूपाने तर कधी पोवाड्यांच्या रूपाने, कधी पुस्तके तर कधी नाटके यामधून या थोर राजाची कीर्ती केवळ महाराष्ट्रात किंवा देशापुरती मर्यादित नसून जगभर पोहचली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता यांच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींच्या या गुणांचे वर्णन लोककलावंतांनी पोवाड्यातून केले आहे. या पोवाड्यातून महाराजांचे पराक्रम आपल्या डोळ्यासमोर हुबेहुब उभे राहतात. हे पोवाडे ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. तर महाराजांच्या जयंतीनिमित्त पाहुया त्यांच्यावरील काही खास पोवाडे. (हेही वाचा: Shiv Jayanti 2022 Date: शिवजयंती तारखेनुसार कोणत्या दिवशी केली जाते साजरी?)

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली जुन्नरजवळील शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी झाला. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ‘’शिवाजी’ असे नामकरण करण्यात आले. महाराजांना राज्यशासनाचे धडे राजमाता जिजाऊंकडून मिळाले, तर दादोजींनी त्यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले. याच्याच जोरावर महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली.