
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राप्रमाणेच त्यांच्या कार्याला आदर्श मानून चालणारे देखील त्यांच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करतात. पण शिवरायांच्या जन्मतिथीवरून मतमतांतर आहेत. महाराष्ट्र सरकार कडून शिवरायांचा जन्मदिन हा फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हा स्वीकारत तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते पण महाराष्ट्राबाहेर अनेक जण ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख मानून देखील हा दिवस शिवजयंती म्हणून साजरी करतात. त्यामुळे यंदा वैशाख शुद्ध तृतीया दिवस 10 मे दिवशी असल्याने या दिवशी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मग या शिवजयंतीच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होणारे Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, Greetings शेअर करत शिवरायांचा जन्मदिवस दिवस नक्कीच साजरा करू शकतात.
जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगालमधे स्थायिक झालेल्या 'सखाराम गणेश देऊस्कर' यांनी बंगाल मध्ये शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली होती. 1902 मध्ये त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. दरम्यान महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी भारतीयांना एकत्र करण्याकरिता शिवजयंती हा राष्ट्रीय सण लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. देऊस्कर देखील त्यांचे अनुयायी असल्याने त्यांनी बंगाल मध्येही शिवजयंती साजरी केली.
शिवजयंतीच्या शुभेच्छा





छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असले तरीही त्यांची युद्धनिती, काळाच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची त्यांची रणनिती आजही प्रशासकांना आदर्श घालून देणारे आहेत. मग अशा या रयतेच्या राजाला त्याच्या जन्मदिनी एक मानाचा मुजरा नक्की करा.