
‘श्रद्धा आणि सबुरी’, ‘सबका मलिक एक है’ अशी वचने कानावर पडल्यास एकच आकृती डोळ्यासमोर येते ती म्हणजे ‘शिर्डीचे साईबाबा’ (Shirdi Sai Baba). गेले कित्येक वर्षे साईबाबा हे देशातीलच नाही तर जगातील त्यांच्या भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. दरवर्षी शिर्डीच्या साई बाबांची पुण्यतिथी (Sai Baba Punyatithi 2021) विजयादशमी अर्थात दसऱ्याला साजरी केली जाते. या दिवसाला शिर्डी साई बाबा महासमाधी दिवस म्हणून ओळखले जाते. या वर्षी शिर्डीच्या साई बाबांची पुण्यतिथी 15 ऑक्टोबर 2021 रोजी येत आहे.
बाबांचा जन्म 28 सप्टेंबर 1835 रोजी झाला होता व मान्यतेनुसार, साई बाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी महासमाधी घेतली होती. असे सांगितले जाते की, या दिवशी जरी त्यांनी देहत्याग केला असला तरी त्यांची उपस्थिती शिर्डीमध्ये अजूनही आहे आणि अनेक भक्तांनाही ते जाणवते. तर या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही साईबाबा पुण्यतिथीचे मेसेजेस, Sms, Greatings, Wishes, HD Images, Gifs आप्तेष्टांना, मित्र मंडळींना पाठवू शकता.





दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी या गांवात बाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणून ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. साईबाबांचा धर्म कोणता, हे कधीच कोणाला कळले नाही. त्यांचे दिसणे एखाद्या मुसलमान फकिरासारखे होते. शिर्डी येथील एका पडक्या मशिदीत त्यांचे वास्तव्य असे परंतु त्या मशिदीला ते ‘द्वारकामाई’ म्हणत आणि तेथे सदैव एक धुनी पेटलेली असे.
मात्र हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोकांचा शिर्डीच्या साई बाबांवर विश्वास आणि श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की श्रद्धा आणि सबुरीचा पाठ शिकवणाऱ्या साई बाबांच्या दरबारातून कोणीच मोकळ्या हाती परत जात नाही. त्यामुळे शिर्डीला बाबांच्या दरबारात नेहमीच भक्तांची रांग असते.