Happy Independence Day 2023 HD Images: स्वातंत्र्य दिन 2023 साठी देशभरात तयारी सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होणार आहेत. भारत यंदा 2023 मध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गेल्या वर्षी भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा भारताने 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याचप्रमाणे, या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होतील, म्हणून यंदा भारत 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल.
दरवर्षी स्वातंत्र्य दिनाची थीम वेगळी असते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम 'राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम' अशी आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन याच थीमवर साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील स्वातंत्र्यदिनामित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Independence Day 2023 Date: यंदा 15 ऑगस्ट दिवशी भारत 76 की 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार)
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.