
भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन यंदा साजरा केला जाणार आहे. ब्रिटिश राजवटी विरूद्ध आवाज उठवत भारताने स्वातंत्र्य मिळवले. 15 ऑगस्ट 1947 च्या रात्री भारत देश स्वतंत्र झाला. या दिवसाचं औचित्य साधत दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासोबत देशासाठी झटलेल्या स्वातंत्र्यसेनानींना आदरांजली अर्पण केली जाते. यानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडावंदन करून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. या वर्षी या सोहळ्याला 76 वर्ष पूर्ण होत आपण 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मग भारतमातेला नमन करत भारताच्या 77व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिगकार्ड्स, WhatsApp Status, HD Images शेअर करत हा आनंद द्विगुणीत करू शकाल.
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' चं आवाहन केले आहे. त्यामुळे भारताचा ध्वज केवळ महत्त्वाच्या ठिकाणी फडकणार नाही तर घराघरात फडकणार आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. Independence Day Speech 2023: 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन भाषण, असा पद्धतीने करा, उपस्थित वाजवतील टाळ्या .
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या
रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम!!
Happy Independence Day

स्वातंत्र्य हा आपला
जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं कर्तव्य आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विविध रंगांचा, विविध ढंगांचा
पण विविधतेतही एकात्मता जपणार्या
भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ब्रिटिश राजवटीमधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला पण देशाची फाळणी देखील झाली. 14 ऑगस्ट दिवशी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट दिवशी भारत हा नवा देश अस्तित्त्वामध्ये आला.